लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : आगामी हिवाळ्यात थंडीपासून बचाव करता यावा यासाठी डेब्रामाळ ता.अक्कलकुवा येथे किशोरवयीन मुलींना उबदार कपडे वाटप करण्यात आले. शिवाय ग्रामस्थांना ब्लॅँकेटही वाटप करण्यात आले. डेब्रामाळ येथील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या समस्या सोडविण्यासाठी गाळेगाव येथील सुप्रिम इंडस्ट्रीजमार्फत डेब्रामाळ येथे विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात आरोग्य तपासणी शिबीर, आरोग्यविषयक मार्गादर्शन व उबदार कपडे वाटप करण्यात आले. यावेळी सुरेखा मंत्री, विपुल पारेख, सुनिल कोल्हे, सी.के.पाडवी, विठ्ठल कदम, उगन वसावे, रंजना नवेज, डॉ.कुलदीप ठाकरे, रुषा पाडवी, गोवींद पावरा, भिमसिंग वळवी, पोलीस पाटील सखाराम वळवी, मांगीलाल वळवी, ओ:या वळवी,शिवराम वळवी, नोवा वळवी, तोरमा वळवी, मालसिंग वळवी, नामदेव वळवी, ओल्या तडवी, पोपटीबाई वळवी, रिताबाई वळवी आदी उपस्थित होते. कार्यक्रमात 50 किशोर वयीन मुलींचे आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यांना याहा मोगी बहुद्देशिय संस्था व सुप्रिम इंडस्ट्रीजमार्फत उबदार कपडे वाटप करण्यात आले. तर 22 विधवा महिलांना देखील मदत करण्यात आली. त्याशिवाय तेथील ग्रामस्थांना ब्लॅँकेट देखील वाटप करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून आयोजकांनी तेथील गरिब नागरिकांना आधार मिळवून देण्याचा प्रय} केला आहे. सातत्याने होणा:या पावसामुळे थंडीचा हंगाम लांबणीवर पडला आहे, थंडी पडण्यापूर्वीच डेब्रामाळ येथील नागरिकांना उबदार कपडे व ब्लॅँकेटही उपलब्ध झाले आहे. त्यामुळे त्या नागरिकांच्या चेह:यावर हसू उमटले आहे.
डेब्रामाळ येथे मुलींना उबदार कपडे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 12:48 IST