शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

40 हजार भाविकांचा व्यसनमुक्तीचा संकल्प : रंजनपूर येथे आरतीपूजन कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड (रंजनपूर) येथे आप पंथाच्यावतीने आयोजित आरतीपूजन कार्यक्रमात 40 हजार भाविकांनी हजेरी लावून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला़ यावेळी आप पंथाचे संस्थापक संत गुलाम महाराज आणि संत रामदास महाराज यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आल़े मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी ...

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील मोरवड (रंजनपूर) येथे आप पंथाच्यावतीने आयोजित आरतीपूजन कार्यक्रमात 40 हजार भाविकांनी हजेरी लावून व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला़ यावेळी आप पंथाचे संस्थापक संत गुलाम महाराज आणि संत रामदास महाराज यांच्या संदेशांचे वाचन करण्यात आल़े मंगळवारी रात्री उशिरा पार पडलेल्या  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ़ मल्लीनाथ कलशेट्टी होत़े प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ़ विजयकुमार गावीत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, डॉ़ कांतीलाल टाटिया, रूपसिंग पाडवी, तळोद्याचे नगरसेवक संजय माळी, हिरामण पाडवी, प्रकाश ठाकरे, किसन महाराज, हितेंद्र क्षत्रिय, डॉ़ शशिकांत वाणी, राजेंद्र राजपूत, विलास डामरे, गौरव वाणी उपस्थित होत़े कार्यक्रमाच्या प्रारंभी हिरामण पाडवी यांनी संत गुलाम महाराज यांच्या कार्याची माहिती दिली़ त्यानंतर जितेंद्र पाडवी यांनी 81 वर्षापासून वर्षातून चारवेळा होणा:या आरतीपूजन कार्यक्रमाची आणि त्याद्वारे चालवण्यात येणा:या व्यसनमुक्तीच्या चळवळीची माहिती दिली़ आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी  मुला-मुलींना शाळेत पाठवले पाहिज़े त्यांच्यासाठी असलेल्या शासनाच्या योजनांचा लाभ घेण्याचे सांगितल़े जिल्हाधिकारी डॉ़ कलशेट्टी यांनी व्यसनमुक्त समाजासाठी संत गुलाम महाराज यांच्या शिकवणीनुसार आयुष्य जगले पाहिजे असे सांगितल़े माजी मंत्री पद्माकर वळवी यांनी गावा गावांमध्ये गुटखा, दारू, जुगार आणि सट्टा बंदी करण्यात येऊन संतांची शिकवण पुढे सुरू ठेवण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केल़े  सूत्रसंचालन गुलाबसिंग गिरासे यांनी तर आभार जितेंद्र पाडवी यांनी मानल़े गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थानसह महाराष्ट्रातील आप पंथीयांनी या कार्यक्रमास हजेरी लावली होती़