शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

तळोदा पंचायत समितीच्या मासीक बैठकीत विविध विषयांवर चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक बैठकीत तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : तळोदा पंचायत समितीच्या मंगळवारी झालेल्या मासिक बैठकीत तालुक्यात सुरू असणाऱ्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी सभापती यशवंत ठाकरे होते.बैठकीला गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, सहाय्यक गटविकास अधिकारी आर.बी. सोनवणे यांच्यासह पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, विजयसिंग राजपूत, पंचायत समिती सदस्य चंदनकुमार पवार, विक्रम रामलाल पाडवी, ईला अनिल पवार, सोनी रोहिदास पाडवी, सुमनबाई वळवी, बांधकाम उपअभियंता एस.व्ही. पवार, लघुसिंचन शाखा अभियंता पवार, ग्रामीण पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता राहुल गिरासे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे, कर्मचारी आदी उपस्थित होते.गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर यांनी शिक्षकांच्या कार्यरत व रिक्त पदांबाबत माहिती दिली. १५ जूनपासून शाळा उघडण्याची शक्यता लक्षात घेऊन शाळा पूर्व तयारी व इतर नियोजन संदर्भात करण्यात येत असणाºया उपाययोजनाची माहिती दिली. बांधकाम विभाग उपअभियंता एस.व्ही. पवार यांनी तालुक्यात चाललेल्या विविध बांधकामाबद्दल सविस्तर माहिती दिली. लघुसिंचन शाखा अभियंता पवार यांनी तालुक्यातील विविध गावातील बंधाºयाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. ग्रामीण पाणीपुरवठ्याचे राहूल गिरासे यांनी तालुक्यातील गावात पाण्याची परिस्थिती काय आहे व यावर्षी पाण्याचे काय नियोजन करावे लागेल याविषयी माहिती दिली.पशुसंवर्धन अधिकारी डॉ.किशोर सामुद्रे यांनी पशुसंवर्धन विभागाकडून आगामी पावसाळ्याच्या अनुषंगाने करावयाचा कामांची बैठकीत माहिती दिली व पशुपालकांना औषधी वाटप करण्यात आल्याचे सांगितले. पावसाळ्यामध्ये साथीचे आजार पसरू नये यासाठीदेखील लसी देण्यात आल्या आहेत. यांसह सर्वच विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी महिन्याभराचा आढावा या बैठकीत मांडला.सभापती यशवंत ठाकरे यांनी बालविकास प्रकल्पांतर्गत येणाºया महिला लाभार्थ्यांमध्ये गरोदर माता व स्तनदा मातांना अंगणवाडी सेविकांमार्फत देण्यात येणाºया पोषण आहारातील अनियमिततेच्या बाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली. अनेक लाभार्थ्यांना अद्याप लाभ मिळाला नसल्याचे तसेच काही ठिकाणी लाभार्थ्यांना अपुºया प्रमाणात साहित्य मिळत असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले. या संबधी त्यांनी संबंधित विभागाला यापुढे लाभार्थ्यांच्या तक्रारी येऊ न देण्याच्या सूचना दिल्या.