शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात आरोग्य सेवा ‘ऑक्सिजन’वर आल्याने रुग्णांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 11:58 IST

वैद्यकीय अधिका:यांसह 86 पदे रिक्त

राधेश्याम कुलथे । ब्राrाणपुरी : ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्याच्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र सुरू करण्यात आले. मात्र आरोग्य केंद्रांमधील वैद्यकीय अधिका:यांसह इतर कर्मचा:यांची अनेक पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त असल्याने नागरिकांना आरोग्याच्या सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. तालुक्यातील आरोग्य सेवा ‘ऑक्सिजन’वर असल्याचे सध्याचे चित्र आहे.शहादा तालुक्यात एकूण 12 प्राथमिक आरोग्य केंद्र व 63 उपकेंद्र आहेत. त्यात आरोग्य सेवकांची (एम.पी.डब्ल्यू.) 81 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 38 पदे वर्षभरापासून रिक्त असल्याची बाब पुढे आली आहे. शहादा तालुक्यात आदिवासी लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात आहे . दुर्गम भागातील नागरिक आरोग्याच्या सोयी-सुविधांपासून वंचित राहू नये यासाठी रिक्त पदे भरण्याची गरज  आहे. शहादा तालुक्यातील आडगाव, प्रकाशा, सारंगखेडा, कहाटूळ, सुलवाडा, कलसाडी, वडाळी, वाघर्डे, कुसुमवाडा, शहाणा, मंदाणे,          पाडळदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 27 वैद्यकीय अधिका:यांची पदे मंजूर असून त्यापैकी 5 पदे रिक्त आहे. जे वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत त्यांच्याकडे इतर आरोग्य केंद्रांचा कार्यभार असल्याने त्यांना रुग्णांना योग्य सेवा देण्यासाठी कसरत करावी लागते. त्यामुळे शहादा तालुक्यातील गरजू रुग्णांना योग्य वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रातील रिक्त पदे तातडीने भरण्याची गरज आहे.शहादा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये वैद्यकीय अधिका:यांसह इतर कर्मचा:यांची पदे रिक्त असल्याने गरजू व गरीब रुग्णांना आरोग्य सुविधा वेळेवर मिळत नाही. परिणामी या रुग्णांना आरोग्य केंद्रातून परतावे लागते. नाईलाजाने खाजगी दवाखान्यात जाऊन उपचार करून घ्यावे लागतात. त्यामुळे डॉक्टरांची फी व औषधांचा खर्च करावा लागतो. शासनाने सुरू केलेले आरोग्य केंद्र व उपकेंद्रांतून वेळेवर वैद्यकीय उपचार मिळत नसल्याने व आर्थिक भरुदड बसत असल्याने रुग्णांकडून नाराजी व्यक्त होत आहे.