शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालय गाठतांना दिव्यांग बांधवांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 18:55 IST

कोठार : तळोदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यान्वित करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय ...

कोठार : तळोदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय प्रशासकीय इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कार्यान्वित करण्यात आल्याने दिव्यांग बांधवांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. वृद्ध व दिव्यांग बांधवांना त्यामुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.तळोदा येथील दुय्यम निबंधक कार्यालय हे पूर्वी खान्देशी गल्लीतील एका भाडे तत्त्वावरील घरात सुरू होते. मर्यादित जागेमुळे तेथेसुध्दा नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे तळोद्यातील दुय्यम निबंधक कार्यालय वेगळ्या इमारतीत स्थलांतर करावे, अशी बºयाच वर्षापासून नागरिकांची मागणी होती. नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता तळोदा येथे खान्देशी गल्लीत सुरू असणारे दुय्यम निबंधक कार्यालय तळोद्याच्या मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. परंतु प्रशासकीय इमारतीत हे कार्यालयात स्थलांतरित झाल्यानंतरदेखील गैरसोय कायम आहे़दुय्यम निबंधक कार्यालयात जमीन, घर, प्लॉट या स्वरूपाची मालमत्ता खरेदी, विक्री, हस्तांतरण, तारण, वारस नोंद यांसारख्या विविध मालमत्ता विषयक व अन्य शासकीय, प्रशासकीय कामकाजासाठी दररोज अनेक नागरिक ये-जा करीत असतात. यात वृद्ध, अपंग व आजारी नागरिकांचादेखील मोठ्या संख्येने समावेश असतो. दुय्यम निबंधक कार्यालयात करण्यात येणारी मालमत्ता खरेदी, विक्रीची कामे ही आॅनलाइन झाल्याने ज्याच्या नावावर जमीन-घर किंवा अन्य मालमत्ता आहे त्या व्यक्तीला व ज्याला खरेदी करायची आहे त्याला समक्ष उपस्थित राहावे लागते. जमिन खरेदी, विक्रीच्या कामांसाठी येणाºया वृद्ध, अपंग, आजारी नागरिकांना जीना चढून वर जाणे त्रासदायक ठरते. बºयाच वृध्द व जेष्ठ नागरिकांना सांधे तसेख गुडघ्याचे विकार असल्याने त्यांची तर प्रचंड गैरसोय होत आहे़ बुधवारी व गुरुवारी अपंग व वृद्ध नागरिकांना जीना चढणे शक्य न झाल्यामुळे चक्क खुर्चीवर बसवून व ती खुर्ची उचलून त्यांना दुसºया मजल्यावरील दुय्यम निबंधक कार्यालय घेऊन जाण्यात आल्याचा प्रकार पाहायला मिळाला.