लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : गेल्या दीड वर्षापासून कोळदा ते खेतिया रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यात शहादा-खेतिया रस्त्यावरील सुसरी धरणाच्या वळणावर रुंदीकरण कामासाठी भरावाचे काम सुरू होते. याठिकाणी उडणाऱ्या धुळीमुळे वाहनधारकांना त्रास होत असून आजारांना निमंत्रण मिळत असल्याने या रस्त्यावर प्रवास करणाºया प्रवाशांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.रस्ता रुंदीकरण कामासाठी सुसरी धरणाच्या वळणावर मातीचा भराव करण्यात आला आहे. या रस्त्यावरुन लहान वाहनांसह अवजड वाहनांची नेहमी वर्दळ असते. अवजड वाहन गेल्यास मातीची धूळ मोठ्या प्रमाणात उडते. या उडणाºया धुळीचा त्रास दुचाकीधारक व लहान वाहनांमधून प्रवास करणाºया प्रवाशांना होतो. प्रवाशांच्या नाका-तोंडात धूळ जात असल्याने आजारांना आमंत्रण मिळून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या महिनाभरापासून उडणाºया धुळीने अनेक जण त्रस्त झाले असून श्वसनाचे आजार, दमा, खोकला, सर्दी आदींची लागण होत आहे. या समस्येला तोंड देता देता प्रवाशांच्या नाकीनऊ आले आहे. रस्त्याचे काम करणाºया ठेकेदाराला रस्त्यावर पाणी मारायला वेळ नाही. मात्र ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे सामान्य नागरिक व प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आंतरराज्य मार्गावर धुळीने प्रवासी हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:17 IST