शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

दिंडीची 51 वर्षाची परंपरा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 12:52 IST

असलोद-सप्तश्रृंगी दिंडी 29 पासून : प्रकाशातील त्रिवेणी संगमावर विधी

लोकमत न्यूज नेटवर्कअसलोद : शहादा तालुक्यातील असलोद ते सप्तशृंगी गड पायी दिंडी कावड यात्रा यावर्षीदेखील काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा असलोदहून 29 सप्टेंबर रोजी वणी गडाकडे प्रस्थान करणार असल्यानेही पदयात्रा गेल्या 51 वर्षापासून अखंडितपणे सुरू असल्याने पदयात्रेला महत्त्व आले आहे.या पायी कावड दिंडीची सुरूवात ब्रrालिन मधुसूदन पाठक (नाना बाबा) यांनी केली होती. ती अद्यापर्पयत अखंडपणे सुरू आहे. यावर्षीदेखील प्रकाशा येथील त्रिवेणी संगमावरून पवित्र तीर्थ आणून मंदिरात पूजा अर्चा करून 27 सप्टेंबर रोजी सकाळी असलोदकडे प्रयाण करणार असून, असलोदहून ही दिंडी 29 रोजी गडाकडे प्रस्थान करणार आहे. यात चिरखान, कोंढावळ, सारंगखेडा, दोंडाईचा, इंदवे, दुसाणे, साक्री, दिघावे, ताराहाबाद, विरगाव, बेज मार्गे नांदुरी गडावर सात दिवसाच्या पायी यात्रेद्वारे पोहणार आहे. दरम्यान 5 ऑक्टोबर रोजी कोजागीरी पौर्णिमा असल्याने रात्री नऊ वाजता सप्तशृंगी देवीची शास्त्रोक्त व वेदोक्त मंत्रोपचारात कावडीद्वारे आणलेल्या पवित्र          तीर्थाने अभिषेक करण्यात येणार आहे.ही पदयात्रा अतिशय नियोजन बद्ध व शिस्तीत निघत असून, यात तीन हजार पेक्षा अधिक भाविक सहभागी होत असतात. या पायी कावड दिंडीच्या मुक्कामाच्या ठिकाणी अन्नदात्यांकडून भाविकांना सहकार्य मिळत असते. तसेच कावड पदयात्रेत भावगीत, भजन, भारूडासह            सप्तशती पाठाचे वाचन करून भाविकांमध्ये उत्साह वाढवतात. या पद यात्रींचा पोशाखा हा पांढरे धोतर, पायजमा, शर्ट व लाल रूमा असा निश्चित केला जातो. या वेळी          सहभागी होणा:या भाविकांना मंडळातर्फे विविध सूचना दिल्या जातात.या पदयात्रेला गडावर महत्त्व प्राप्त झाले असून, पदयात्रेला शाम दिनकर जाधव यांचे विशेष सहकार्य लाभते. पदयात्रा यशस्वितेसाठी सप्तशृंगी देवी पदयात्रा सेवा मंडळाचे अध्यष धर्मा शिंदे, सचिव उद्धव पाटील, दिलीप राजभोज, भटू पाठक, जगदीश पाटीलसह मंडळाचे सदस्य प्रय}शिल राहतात.