शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार 400 खातेधारकांचे डिजिटल सातबारे पूर्ण : तळोदा तालुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 13:11 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : ऑन लाईन सातबा:याच्या प्रक्रियेनंतर आता येथील महसूल प्रशासनाकडून डिजिटल स्वाक्षरीच्या सातबा:याची प्रोसीझर राबविली जात आहे. आतापावेतो 27 हजार सातबा:यांपैकी तालुक्यातील एक हजार 400 खातेधारकांचे डिजिटल सातबारे पूर्ण करण्यात आले आहे. 31 ऑगस्टअखेर सर्वच शेतकरींना डिजिटल सातबारा देण्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी सर्वरच्या सातत्याने येणा:या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 16 : ऑन लाईन सातबा:याच्या प्रक्रियेनंतर आता येथील महसूल प्रशासनाकडून डिजिटल स्वाक्षरीच्या सातबा:याची प्रोसीझर राबविली जात आहे. आतापावेतो 27 हजार सातबा:यांपैकी तालुक्यातील एक हजार 400 खातेधारकांचे डिजिटल सातबारे पूर्ण करण्यात आले आहे. 31 ऑगस्टअखेर सर्वच शेतकरींना डिजिटल सातबारा देण्याचा दावा प्रशासनाने केला असला तरी सर्वरच्या सातत्याने येणा:या अडथळ्यामुळे हे टार्गेट पूर्ण करणे दिव्यच आहे. त्यामुळे शासनाने याबाबत ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा आहे.कुठलीही योजना, पीक कर्ज अथवा खरेदी विक्रीचा व्यवहार असो, शेतक:यांचा सातबारा हा अत्यंत महत्त्वाचा ठरत असतो. साहजिकच शेतकरी आपला सातबारा केव्हाही काढत असतो. सातबा:याविना त्याचा व्यवहारदेखील ठप्प होत असतो. सातबारा काढण्यासाठी त्यास महसूली यंत्रणेकडे सातत्याने हेलपाटे मारावे लागतात. काही वेळेस चिरीमिरी सुद्धा द्यावी लागत असते. या उपरांतही त्यास लगेच सातबारा मिळत नाही, अशा अनेक तक्रारी लक्षात घेऊन शासनाने शेतक:यांना कुठेही, केव्हाही तत्काळ सातबारा उपलब्ध होण्यासाठी सन 2002 मध्ये ऑनलाईन सातबारा देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. तथापि प्रत्यक्षात सातबा:याची ऑनलाईन प्रक्रिया करण्याची सुरूवात 2014 पासून करण्यात आली.तळोदा तालुक्यातही येथील महसूल विभागानेही तळोदा तालुक्यातील 91 गावांमधील साधारण 27 हजार 67 खातेधारक शेतक:यांचे सातबारे ऑनलाईन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. आतापावेतो 26 हजार सातबारे ऑनलाईन झाल्याची माहिती देण्यात आली आहे. अर्थात ही माहिती संगनकात भरतांना अनेक तांत्रिक अडथळ्यांची शर्यत पार करत पूर्ण केली आहे. सातबा:याची ऑनलाईन प्रक्रियेनंतर सध्या हे सातबारे डिजिटल स्वाक्षरीने देण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. 27 हजार सातबा:यांपैकी साधारण एक हजार 400 सातबारे पूर्ण करण्यात आले आहे. महसूल विभागाने येत्या 31 ऑगस्ट 2018 अखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनास दिले आहे. येथील महसूल प्रशासनानेदेखील युद्ध पातळीवर प्रयत्न करून सदर लक्ष पूर्ण करण्याचा दावा केला असला तरी सर्वरच्या अडथळ्यांमुळे हे टार्गेट पूर्ण करणे या प्रशासनापुढे दिव्य असल्याचे म्हटले जात आहे. कारण प्रभावी नेटवर्क अभावी सर्वर डाऊन होत असल्याने कामात खोडा घातला जात असतो. तास्न तास तेथेच ताटकळत बसावे लागत असल्याची कर्मचा:यांची व्यथा आहे. साहजिकच याप्रकरणी शासनाने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तरच शासनाच्या हेतू सफल होईल अन्यथा डोंगर पोखरून निघाला उंदीर अशी या योजनेची गत होईल.