लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील निंभेल-कं्रढे या दोन गावांसाठी तापी नदीवरुन पाणी देण्याची योजना सध्या वादात सापडली असून पाणी पुरेसे ठरत नसल्याचा दावा ग्रामस्थांचा आह़े यामुळे भीषण पाणी टंचाई उद्भवली असून यावर मार्ग काढण्याची मागणी आह़े जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून दुष्काळग्रस्त असलेल्या निंभेल आणि कं्रढे या दोन गावांसाठी तापी नदीवरुन एकत्रित पाणी योजना मंजूर करण्यात आली होती़ यातून मिळणारेपाणी हे अपुरे असल्याने दोन्ही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आह़े याबाबत ग्रामस्थांकडून देण्यात आलेल्या निवेदनात, गेल्या चार वर्षापासून या गावांमध्ये पाणीटंचाई आह़े पाण्यासाठी ग्रामस्थांना दररोज कसरत करावी लागत आह़े निंभेल आणि कं्रढे येथे पिण्याच्या पाण्यासाठी असलेल्या विहिरीत तापी नदीचे पाणी सोडले आह़े परंतू केवळ 15 मिनीटे हा पाणी पुरवठा होतो़ परिणामी विहिरीवर पाणी भरण्यासाठी मोठी गर्दी होत़े यातून कठडे नसलेल्या विहिरीत ग्रामस्थ पडून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आह़े याठिकाणी जिल्हा प्रशासनातील एकाही अधिका:याने भेट दिलेली नाही़ अधिका:यांनी गावात येऊन शहनिशा करत पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात आली आह़े निवेदनावर दिपक पंढरीनाथ पाटील, छगन पाटील, विजय पाटील, सोमा पाटील, गणेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांच्या सह्या आहेत़
निंभेल-कं्रढे येथे तापीचे पाणी पोहोचण्यात येताहेत अडचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 13:01 IST