शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

डिझेलचे दर गगनाला भिडल्याने शेतीची मशागत करणे झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:34 IST

पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना ...

पूर्वी शेतीची कामे बैलांच्या मदतीने नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी अशी सर्व कामे केली जायची. यामध्ये कोणताही खर्च शेतकऱ्यांना येत नव्हता. घराच्या पुढे दावणीला बांधलेल्या बैलांनी कामे व्हायची. प्रत्येक शेतकरी आपल्या खुंट्याला बैल ठेवत असे. बैलांची जास्त संख्या असेल तर शेतकरी मोठा समजला जायचा आणि बैल नसेल तर तो शेतकरी नाही, असे समीकरण तयार झाले होते. बदलत्या काळानुसार यांत्रिकीकरण आले अन्‌ शेतात बैलांऐवजी ट्रॅक्टर घुसला. मागील दशकापासून शेतीत आमूलाग्र बदल झाला. चार दिवसांची कामे एक तासात व्हायला लागली, एक पीक काढले की अवघ्या एक दिवसात मशागत करून दुसरे पीक उभे राहील अशी साधने निर्माण झाली. नांगरणी, कोळपणी, फवारणी, पीक वाहतूक करणे, रोटा फिरवून गवत कापणे अशी सर्व कामे ट्रॅक्टरच्या साहाय्याने होऊ लागली. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाचाला, अंग मेहनत वाचली मात्र शेतीसाठी लागणारा खर्च वाढला. आज डिझेलचे दर गगनाला भिडले आणि व्यवसाय करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांनी कामांचे दर वाढवले, डिझेल महाग झाल्यामुळे येणारा पैसा त्यात खर्च होत असल्यामुळे चार पैसे शिल्लक रहावे म्हणून मशागतीचे दर वाढले आणि पर्यायाने शेतीचे उत्पादन आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जाऊ लागली आहे. ट्रॅक्टरची मशागत शेतकऱ्यांना आज परवडणारी नसली तरी काळानुरूप बैलांच्या मदतीने शेती करणेही आज तरी माणसाला शक्य नाही. यासाठी शेतीला पुरविण्यात येणाऱ्या डिझेलवरील कर कमी करून शेतकऱ्यांना दिलासा देण गरजेचे आहे.

सद्य:स्थितीतील शेती मशागतीचे दर असे (प्रती एकर) : नांगरणी एक हजार ८०० रुपये, रोटा मारणे दोन हजार रुपये, फणणी एक हजार ६०० रुपये, वाफे तयार करणे एक हजार ६०० रुपये रन, सरी पाडणे एक हजार रुपये याप्रमाणे दर आहेत.

धावपळीच्या युगात शेतीची कामे लवकर व्हावी यासाठी ट्रॅक्टरला अवजारे जोडून शेतीची कामे केली जातात. आज जवळपास सर्व शेतकरी ट्रॅक्टरद्वारे शेती करतात. परंतु डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे मशागतीचेही दर वाढले आहेत. शेतीचे उत्पन्न आणि वाढता खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेती तोट्यात जात आहे. शासनाने शेतीच्या कामासाठी वापरत असलेल्या अवजारांना मिळणारे डिझेलचे भाव कमी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.

-सुनील कोळी, शेतकरी, तोरखेडा, ता.शहादा

डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टरने मशागत करावयाच्या कामाचे दर वाढवावे लागले. ट्रॅक्टरसाठी लागणारा खर्च आणि शिल्लक यांचा ताळमेळ बसत नसल्याने धंदा तोट्यात जाऊ लागला. कोणताही व्यवसाय तोट्यात करणे शक्य नाही म्हणून दर वाढले त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

-दीपक कुंभार, ट्रॅक्टर व्यावसायिक, तोरखेडा, ता.शहादा