शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

काठीच्या होळीत राजकीय ‘धुळवड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:44 IST

नंदुरबार : सातपुड्यातील ऐतिहासिक काठी, ता.अक्कलकुवा येथील रजवाडी होळी यंदा ही राजेशाही थाटात साजरी झाली. या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे ...

नंदुरबार : सातपुड्यातील ऐतिहासिक काठी, ता.अक्कलकुवा येथील रजवाडी होळी यंदा ही राजेशाही थाटात साजरी झाली. या होळीचे वैशिष्ट्ये म्हणजे या वेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राजकीय नेत्यांची अनोखी धुळवड पाहायला मिळाली.काठी येथील होळी पारंपारिक पद्धतीने साजरा झाली. या होळीत रात्रभर परिसरातील भाविक परंपरागत नृत्य करीत असतात. त्यात राजकीय नेत्यांनीही सहभाग घेतला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर या नेत्यांचा सहभाग लक्षवेधी ठरला. विशेषत: नृत्य एैन रंगात आले असतांना मध्यरात्रीनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी हजेरी लावली. सुमारे तासभर ते तेथे सहभागी झाले. काँग्रेसचे उमेदवार अ‍ॅड.के.सी. पाडवी यांच्या सोबत त्यांनी हातात हात घेवून ढोलच्या ठेक्यावर ठेका धरत नृत्य केले. या वेळी जिल्हा परिषदेचे सदस्य व माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल व काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य रतन पाडवी, माजी समाजकल्यान सभापती सी.के. पाडवी हेही उपस्थित होते. काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांनी एकत्रितपणे होळीचा लुटलेला हा आनंद सध्याच्या राजकीय पार्श्वभूमिवर लक्षवेधी ठरला. दरम्यान पालकमंत्री तेथून रवाना झाल्यानंतर भाजपच्या उमेदवार डॉ.हिना गावीत यांनीही या होळीत हजेरी लावली.