ऑनलाईन लोकमत/ संतोष सूर्यवंशी
नंदुरबार, दि.18- केंद्रशासनाच्या वनबंधु योजनेअंतर्गत महाराष्ट्रातून जिल्ह्यातील धडगाव तालुक्याची निवड करण्यात आली आह़े या तालुक्यातील 100 विद्याथ्र्याना पुणे येथील बालेवाडी या आंतरराष्ट्रीय क्रिडा संकुलनात विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येणार आह़े
केंद्रशासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून वनबंधु योजना राबविण्यात येत असत़े आदिवासी विद्याथ्र्याचा विकास व्हावा यासाठी शासनाकडून ही योजना राबविण्यात येत आह़े दरम्यान, या योजनेअंतर्गत धडगाव तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा व अनुदानीत आश्रमशाळा यातील शंभर विद्याथ्र्याना सोबत घेत जिल्हा क्रीडा विभागाकडून त्यांना पुणे येथील बालेवाडी हे आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलन दाखविण्यात येणार आह़े तसेच काही 29 एप्रिलर्पयत त्यांना तेथे विविध खेळांची माहिती देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ दरम्यान, सायंकाळी सात वाजता पुणे येथे विद्यार्थी रवाना होणार असल्याची माहिती राठोड यांनी दिली़
दरम्यान, या विद्याथ्र्याची क्रीडा नैपुन्य चाचणी घेण्यात येणार असून यात खो-खो, व्हॉलीबॉल, कबड्डी, हेन्डबॉल, विविध अॅथलेटीक्स खेळ आदीचा समावेश असणार आह़े या क्रीडा चाचण्यांमध्ये 30 पैकी 20 गुण मिळविणा:या खेळाडूंना बालेवाडी येथे संबंधित खेळाच्या पुढील सरावासाठी प्रवेश मिळणार आहे.
वनबंधु योजनेअंतर्गत राज्यातून धडगाव तालुक्याची निवड केली आह़े त्यानुसार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील समितीने धडगाव येथे जात शासकीय तसेच अनुदानित आश्रमशाळेच्या खेळाडूंची निवड पूर्व चाचणी घेतली असून त्यातून 50 मुले व 50 मुली अशा एकूण 100 खेळाडूंची निवड करण्यात आली आह़े
-घनश्याम राठोड
जिल्हा क्रीडा अधिकारी,नंदुरबार