शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
3
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
4
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
5
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
6
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
7
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
8
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
9
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
10
India vs Pakistan मध्ये भारतच जिंकेल; पाकिस्तानच्या माजी खेळाडूनं व्यक्त केला विश्वास
11
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
12
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
13
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
14
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
15
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
16
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात
17
Fact Check: हेलिकॉप्टरला लटकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ PM मोदींच्या रॅलीचा नसून परदेशातील; जाणून घ्या सत्य
18
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
19
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
20
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?

विकास सांस्कृतिक महोत्सव व व्याख्यानमालेला प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 12:17 PM

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : शहादा तालुका एज्युकेशनल अँड को-ऑप. एज्युकेशन सोसायटीच्या येथील डॉ.विश्रामकाका शैक्षणिक संकुलात दोन दिवसीय विकास ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : शहादा तालुका एज्युकेशनल अँड को-ऑप. एज्युकेशन सोसायटीच्या येथील डॉ.विश्रामकाका शैक्षणिक संकुलात दोन दिवसीय विकास सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन व ‘विकास दीपस्तंभ’ पुरस्काराचे वितरण संस्थेचे अध्यक्ष मोतीलाल पाटील यांच्या हस्ते झाले. दरम्यान, संस्थेचे संस्थापक चेअरमन व माजी आमदार कै.डॉ.विश्रामकाका पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे व्याख्यानमालेलाही प्रारंभ झाला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, गटशिक्षणाधिकारी ए.डी. पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी एम.एस. बंजारा, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पटेल, संचालक अभिजित पाटील, मानद सचिव प्रा.ए.के. पटेल, सहसचिव विश्वनाथ पाटील, संचालक नरेंद्र शहा, हैदरअली नुरानी, डॉ.अजरुन पटेल, विनायक पटेल, कांताबाई पटेल, प्राचार्य सी.व्ही. चौधरी, शिक्षक पालक संघाचे सचिव नरोत्तम पटेल, माजी प्राचार्य जयराज बि:हाडे, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका शोभना पटेल, उपप्राचार्य एस.जे. पटेल, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, विकास प्राथमिकचे मुख्याध्यापक विशाल तांबोळी, पर्यवेक्षिका उषा खैरनार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी पुंडलिक सपकाळे म्हणाले की, शाळेतून शिक्षणासोबत चांगले संस्कारही भेटतात. शाळेत ज्या गोष्टी शिकण्यासाठी येतो त्या गोष्टी मनापासून शिकाव्यात. त्यातून कोणी मोठा अधिकारी तर कोणी शास्त्रज्ञ होतो. आपल्या अंगी असलेल्या  सुप्तगुणांना वेळप्रसंगी वाव दिला पाहिजे. तुमच्यातही शास्त्रज्ञ लपला आहे. शिकून मोठे झाल्यावर आपल्या कुटुंबीयांचे, परिसराचे, जिल्ह्याचे नाव मोठे करावे. आई-वडिलांचा सर्वात मोठा सन्मान हाच असतो, असे सांगितले. मोतीलाल पाटील म्हणाले की, संकुलातील विद्याथ्र्याच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी  कार्यक्रमाची परंपरा कायम ठेवली आहे. विद्याथ्र्यामधील कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. दरम्यान, दोन दिवसीय चालणा:या सांस्कृतिक महोत्सवाचा मंगळवारी समारोप आहे. प्रास्ताविक प्राचार्य सी.व्ही. चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.डॉ.पुष्कर शास्त्री यांनी तर आभार एस.डी. भोई यांनी मानले.व्याख्यानमालेला प्रारंभशहादा येथील तालुका एज्युकेशन संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक चेअरमन माजी आमदार कै.डॉ.विश्रामकाका पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ येथे व्याख्यानमालेला प्रारंभ झाला.  व्याख्यानमालेचे हे नववे वर्ष असून अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील होते. व्याख्यानमालेचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी डॉ.चेतन गिरासे यांच्या हस्ते रिमोटची कळ दाबून करण्यात आले. या वेळी तहसीलदार मिलिंद कुलकर्णी,  रमाकांत पाटील, जि.प. सदस्य अभिजित पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष हिरालाल पाटील, सचिव प्रा.ए.के. पटेल, सहसचिव विश्वनाथ पाटील, संचालक नामदेव पटले,  गजेंद्र गोसावी, विठ्ठल पाटील, डॉ.सखाराम पाटील, उत्तम पाटील, शिवशाहीर डॉ.विजय तनपुरे, हैदरअली                नुरानी, प्राचार्य सी.व्ही. चौधरी आदींसह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. डॉ.गिरासे म्हणाले की, आपल्या जिल्ह्याची ओळख मागास जिल्हा म्हणून आहे. व्याख्यानमालेतून सामान्य नागरिकांना चांगला संदेश जाईल. मोतीलाल पाटील म्हणाले की, आजचा तरुण हा मोबाईलच्या आहारी गेल्याने वाचन संस्कृती लयास चालली आहे. पिढी सुधरवण्याचे काम पालकांचेही असते. परिसरातील रसिक श्रोत्यांना व्याख्यानाचा आनंद मिळावा यासाठी विश्रामकाका व्याख्यानमाला सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. प्रास्ताविक सचिव प्रा.ए.के. पटेल यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.पुष्कर शास्त्री यांनी तर आभार उपमुख्याध्यापक एस.डी. भोई यांनी मानले.

शेठ व्ही.के. शहा विद्यामंदिर व कै.सौ.जी.एफ. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व बेंगलुरु येथील ज्येष्ठ वैमानिक शास्त्रज्ञ डॉ.अंबालाल विनायक पटेल व डॉ.विजय विनायक पटेल यांना ‘विकास दीपस्तंभ’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. भारतासाठी अत्यंत वेगवान तेजस विमानाच्या निर्मितीत पटेल बंधूंचे महत्त्वपूर्ण योगदान होते. या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. काही कारणास्तव ते प्रत्यक्ष हजर राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने त्यांचे वडील विनायक पटेल व त्यांच्या आई कांताबाई पटेल यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.