शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सुविधांच्या अभावाने पर्यटकांचा हिरमोड

By admin | Updated: February 6, 2017 00:15 IST

तोरणमाळ : विद्याथ्र्याच्या सहली व पर्यटकांची गर्दी, सोयी उपलब्ध करून देण्याची गरज

शहादा : महाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सुटीच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी राहते. येथील निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्यातील विविध ठिकाणांहून अनेक कुटुंबे येतात. मात्र या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे.महाराष्ट्रातील विविध भागांतून पर्यटक तोरणमाळ येथे येतात. आठवडय़ाच्या शेवटी या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात गर्दी होत असते. या ठिकाणी शाळा-महाविद्यालये सहलीचे आयोजन करून विद्याथ्र्याना निसर्गरम्य वातावरण व भौगोलिक माहिती व्हावी यासाठी घेऊन येत आहेत. काही पर्यटक धुळे, नाशिक, गुजरात आदी ठिकाणांहून कुटुंबांसह येऊन या निसर्गरम्य ठिकाणी रमताना दिसून येतात.तोरणमाळ येथील सातपायरी घाटापासूनच निसर्गाचे सुंदर दृश्य पर्यटकांना आकर्षित करीत आहे. या परिसरातील सीताखाई, सनसेट पॉईंट, खडकी पॉईंट, मच्छिंद्रनाथ गुंफा, यशवंत तलाव आदी ठिकाणी पर्यटक कुटुंबांसह वनभोजनाचा आनंद घेतात. यशवंत तलावातील बोटींगमुळे बालकांसह ज्येष्ठ मंडळीही तोरणमाळला अधिक पसंती देताना दिसून येते. या नयनरम्य ठिकाणासह येथील गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागत आहेत. त्यामुळे स्थानिक आदिवासी बांधवांना फळे, फुले विकून रोजगार उपलब्ध होत आहे.या ठिकाणी येणा:या पर्यटकांसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध करून दिल्यास अजून संख्या वाढणार आहे. त्यामुळे स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार असल्याने संबंधित विभागाने या ठिकाणी सोयी-सुविधा पुरविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.निसर्गाने सातपुडा पर्वत रांगेत मनाला मोहून टाकेल एवढे मोठे नयनरम्य देखावे दिले आहेत. मात्र निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर या ठिकाणी प्राथमिक सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होतो.     -अनिल पाटील, पर्यटक, धुळेमहाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा आहे.    -मोहित ठाकरे, पर्यटक, शहादाविश्रांतीगृह व ओटय़ांची दुरवस्थामहाराष्ट्रातील दुस:या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असूनदेखील या ठिकाणी सुविधांचा अभाव असल्याने पर्यटकांचा हिरमोड होत आहे. या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या विश्रांतीगृहांची व बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ओटय़ांची अवस्थाही वाईट झाली आहे. या ओटय़ाच्या फरशा निघालेल्या आहेत, पत्रेदेखील तुटलेले आहेत. परिसरात एकही सार्वजनिक शौचालय नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागतो. या ठिकाणी गाजावाजा करीत वृक्षारोपण केल्यानंतर लक्ष न दिल्याने रोपे सुकलेल्या अवस्थेत दिसून येतात.