शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक टर्मिनस होऊनही नंदुरबारात जड वाहतूक कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रक टर्मिनसचे काम पुर्ण झाल्यामुळे ते येत्या 26 जानेवारीपासून पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असली तरी शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी संयुक्तरित्या याबाबत नियोजन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वीच शहरात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत जड वाहनांना बंदी असली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ट्रक टर्मिनसचे काम पुर्ण झाल्यामुळे ते येत्या 26 जानेवारीपासून पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. यामुळे शहरातील वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होणार असली तरी शहर वाहतूक शाखा आणि पोलिसांनी संयुक्तरित्या याबाबत नियोजन करणे आवश्यक राहणार आहे. यापूर्वीच शहरात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत जड वाहनांना बंदी असली तरी त्याचे पालन होत नाही.नंदुरबारातील जड वाहनांची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. शहर वाहतुक शाळा शिस्त लावण्यासाठी प्रय}शील असली तरी शहरातील अरुंद रस्ते, त्यावर वाढलेले अतिक्रमण आणि वाहनचालकांमध्येच स्वयंशिस्तीचा अभाव यामुळे वाहतूक शाखेलाही हात टेकावे लागतात. आता पालिकेने ट्रक टर्मिनस उभारले आहे. ते येत्या काही दिवसात पुर्णपणे कार्यान्वीत झाल्यावर शहरातील वाहतुकीची समस्या सुटेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.नंदुरबारात मोठे व्यापारी, गोडावूनमध्ये माल उतरविणारे हे सर्रास मोठी वाहने, अवजड ट्रका शहरात आणतात. अनेक व्यापा:यांचे गोडावून व होलसेलची दुकाने ही शहराच्या मध्यवर्ती भागात असल्यामुळे नाईलाजाने अशी वाहने शहरात आणावी लागतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या नेहमीच निर्माण होते. याशिवाय लहान, मोठे अपघात देखील होतात. त्यामुळे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्याची मागणी होत होती.वाहतूक शाखेचेही आदेशवाहतूक शाखेने पाच ते सहा वर्षापूर्वी दिवसा अर्थात सकाळी नऊ ते रात्री सात वाजेर्पयत शहरात अवजड वाहनांच्या प्रवेशाला बंदी घातली होती. परंतु अधिकारी बदलल्यानंतर आदेशही रद्द होतात किंवा बदलतात. या आदेशाचीही तीच स्थिती झाली. संबधित विभागाचे अधिकारी बदलले आणि लागलीच निर्णयही बदलला गेला. यामुळे जड वाहने सर्रास दिवसभर शहरात येतात. अरुंद रस्त्यांवर ते तासंतास रहदारीची समस्या निर्माण करतात. वाहतूक शाखेत आधीच कर्मचा:यांची संख्या कमी असल्यामुळे सर्वच ठिकाणी वाहतूक पोलीस पोहचू शकत नसल्यामुळे प्रश्न  निर्माण होतात.ट्रक टर्मिनस तयारशहरात पालिकेने तयार केलेले ट्रक टर्मिनस बांधून तयार आहे. त्याचा शुभारंभही करण्यात आला. परंतु काही कामे अपुर्ण असल्यामुळे ते पुर्णपणे कार्यान्वीत करण्यात आले नव्हते. आता कामे पुर्ण झाल्यानंतर येत्या 26 जानेवारीपासून ट्रक टर्मिनस पुर्णपणे कार्यान्वीत होणार आहे. त्यामुळे पालिकेतर्फेच आता शहरात जड वाहनांना प्रवेश बंदी केली जाणार आहे. समन्वयाने अंमलबजावणी व्हावीशहर वाहतूक शाखा आणि पालिकेने आता या आदेशाची समन्वयाने अंमलबजावणी करावी. पालिकेने सर्व गोडावून मालक, होलसेल विक्रेते आणि इतर व्यापा:यांना यासंदर्भात नोटीसा बजावून त्यांचे माल घेवून येणारे जड वाहने सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेर्पयत शहरात येणार नाहीत. आल्यास दंडात्मक कारवाई करावी असे निर्देश देणे आवश्यक आहे. वाहतूक शाखा देखील कायदेशीर कारवाई करणारच. दोघांनी समन्वयाने या आदेशाची अंमलजावणी केल्यास वाहतुकीची समस्या सुटणार आहे.