शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: ट्रकचालकाचे अपहरण करणारे पूजा खेडकरचे आई वडील फरार; गेटवरून उड्या मारून पोलीस पोहोचले घरात
2
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
3
सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव
4
होय... ५० हजारांच्या पगारात २ कोटींचा फंड शक्य आहे! फोलो करा ५०-३०-१०-१० चा गुंतवणूक फॉर्म्युला
5
Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
6
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
भय इथले संपत नाही! मंकीपॉक्सनंतर नव्या व्हायरसचं संकट; 'ही' आहेत लक्षणं, 'या' लोकांना धोका
8
7 वर्षांच्या वॉरंटीसह Royal Enfield ने लॉन्च केली नवीन Meteor 350; GST कपातीनंतर किंमत फक्त...
9
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
10
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
11
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
12
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
13
एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या
14
बाथरुममधील बादली खूपच खराब झालीय? एकही रुपया खर्च न करता 'अशी' दिसेल नव्यासारखी
15
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
16
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
17
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
18
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
19
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
20
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत

गुजरातची सीमा असतानाही नवापुर सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 11:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : जिल्ह्यातील इतर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतांना गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : जिल्ह्यातील इतर तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असतांना गुजरात सीमेवरील नवापूर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ न देण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याने प्रशासनाला आजवर यश आले आहे. लॉकडाऊनच्या चौथ्या व बहुधा अंतिम टप्प्यात हाच पायंडा टिकवून ठेवण्यासाठी सामूहिक प्रयत्न जारी ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.गुजरात राज्याच्या हद्दीवरील व राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर तालुक्यातुन कोरोनाचा शिरकाव जिल्ह्यात होतो की काय? अशी भिती प्रारंभी जनसामान्यांसह प्रशासनातही होती. त्याचे कारणही तसेच होते. सुरत जिल्ह्यात त्या वेळी कोरोनाने आपले डोकेवर काढले होते. लॉकडाऊनच्या तीन टप्प्यात केंद्र व राज्य शासन तथा जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या प्रत्येक आदेश व नियमांचे पालन करून नवापुरकर जनतेने आपली भुमिका व प्रशासनास द्यावयाची साथ अंमलरूपी दाखवून दिली. शिस्तीत राहण्याची सवय नसल्याने व अचानक शिस्तीत आणले गेल्याने काहींना त्यातुन दंडात्मक कारवाईसही सामोरे जावे लागले.जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या प्रशासनाची समयसूचकता व तत्परता जिल्ह्याने या कोरोनाच्या काळात जवळून अनुभवली. जिल्ह्याला लागून असलेल्या पर राज्यातील जिल्ह्याच्या प्रशासनाशी संपर्कात राहुन त्यांनी गुजरात व मध्यप्रदेशमधून कोरोनाचा जिल्ह्यात शिरकाव होणार नाही याची पुरेपुर दक्षता घेतली व त्यात ते यशस्वीदेखील झालेत. बेडकी येथील गुजरात सरहद्दीवर महाराष्ट्र व गुजरात अश्या दोन्ही राज्यांचे संयुक्त पथक २४ तास कार्यरत ठेवण्यात आल्याने परराज्यातुन कोरोनाच्या शिरकावाची शक्यता प्रशासनाला फोल ठरविता आली. तालुक्याच्या सर्व सीमा सिलबंद करून ग्रामसुरक्षा दलाचा उभारलेला खडा पहारा लाभदायक ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.नवापुरची पालिका अनेकांच्या टिकेच्या भक्ष्यस्थानीही आली. मात्र प्रभारी मुख्याधिकारी पदाचा कार्यभार हाती आलेल्या नायब तहसीलदार राजेंद्र नजन यांनी आपल्या कार्यातून लोकांचा रोष शमविण्यासह काही घटनांमध्ये कारवाईचा बडगा उभारून लोकांचा विश्वासही संपादीत केला. लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात शहरास सील करण्याचा निर्णय शासकीय स्तरावर घेण्यात आला.पोलीस प्रशासनाची कमी कर्मचारी संख्येवर लॉ अ‍ॅण्ड आॅर्डर सांभाळण्यासह दैनंदीन कामे पार पाडतांना दमछाक होत राहीली. पोलीस निरिक्षक विजयसिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरिक्षक धीरज महाजन, उपनिरिक्षक नासीर पठाण व विसरवाडीचे पोलीस निरिक्षक गणेश न्याहदे यांनी कोरोनाच्या या काळात उभारलेला बंदोबस्त, अवैध दारू व तंबाखुजन्य पदार्थांची रोखलेली वाहतूक या सारखी कामे करतांना दैनंदीन घडणाºया गुन्ह्यांची केलेली उकल सराहनीय अशीच राहीली.आरोग्य यंत्रणेचे तालुक्यातील काम वाखाणण्याजोगे राहीले. जवळपास चार हजाराहून अधिक लोकांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. त्यांच्या तपासण्या करीत त्यांच्यावर नजर ठेवून आरोग्य विभागाने मोलाची भुमिका बजावली. शासनाच्या अधिपत्याखाली वरिष्ठ महाविद्यालयाचे वसतीगृह व जयहिंद छात्रालय येथे विलगीकरण कक्ष सुरू करून तेथे येणाºया नागरिकांची निगाराखण्यात आली. शेल्टर होम सुरू करण्याची वेळ आरोग्य विभागावर आली. प्रभारी तहसीलदार म्हणून उल्हास देवरे यांना लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्यात कार्यभार देण्यात आला. त्यांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त मेहनतीने गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांची भुमिका महत्वपूर्ण राहिली. वरिष्ठ पातळीवर व्हीडीओ कॉन्फरंसीं असो की धोरणांची अंमलबजावणी असो, प्रत्येक कार्य त्यांनी कुशलतेने हाताळलीत.

तालुक्यास ग्रीन झोनमध्ये ठेवण्यासाठी तालुक्याच्या सीमा बंदीस्त करणे सर्वाधिक उपयुक्त ठरले. तालुक्यातील पी.एच.सी, ग्रामीण रूग्णालयांतर्गत पूर्ण डेटा गोळा केला. त्यातुन नक्की स्वॅब किती व कुणाचे घ्यावे हे ठरविले. परिणामी जास्त लक्ष द्यावे लागले नाही. तालुक्याचा दोन वेळा सर्वे करून अंमल केल्याने आत्मविश्वास वाढला. त्यासाठी ४५ पथक तालुक्यात कार्यरत ठेवले. -नंदकुमार वाळेकर, गटविकास अधिकारी, नवापूरपालिका प्रशासनाने परिस्थिती जाणून घेतली. फवारणीचे नियोजन करून सक्त ताकीद देत ट्रॅक्टर फवारणी, धुळ फवारणी करून पाच हॅण्ड स्प्रेचा वापर केला. आरोग्य कर्मचारी यांना आवश्यक साहित्य देत वाहने सॅनिटायझ केले. पाणीपुरवठ्याचे नियोजन करून शहरात सोशल डिस्टन्सिंग व मास्क वापरासाठी जनजागृती केली. फेरीवाले व भाजीपाला विक्रेत्यांना पर्यायी जागा म्हणून नदीकिनारी नेले. काही प्रसंगात कटू कारवाई म्हणून तराजु जप्त केले व दंडात्मक कारवाई केली. कृषी विभाग व त्यांच्या सहा बचत गटांच्या सहाय्याने भाजीपाला विक्रेते वार्डनिहाय कार्यरत केले.- राजेंद्र नजन, तत्कालीन पालिका मुख्याधिकारी, नवापूरदेशात कोरोना आल्यापासून तालुक्यात जनजागृती सुरू केली. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय रूग्णांमधील लक्षणांच्या नोंदी ठेवल्या व त्यावरू न उपचार सुरु केले. त्यांची इम्युनिटी वाढविली. तालुक्यात दाखल झालेल्या प्रत्येक स्थलांतरीताची निगा राखली. तालुक्यात २५५ पथक तयार केले. कोरोनाचे सायलेंट बॅरीयर तालुक्यात असू शकतात. आगामी पावसाळा पाहता खरा लढा आता सुरू झाला आहे व त्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.- हरिश्चंद्र कोकणी, तालुका वैद्यकीय अधिकारी, नवापूर