शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानीच्या पंचनाम्यांबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:21 IST

परतीच्या पावसाचा फटका : शेतकरी हवालदिल, लाखोंचे नुकसान

ठळक मुद्देपावसाच्या सरासरीत तीन टक्क्यांनी वाढ जिल्ह्यात पावसाळ्याच्या चार महिन्यात 89 टक्के पाऊस झाला. परंतु परतीच्या पावसामुळे ही टक्केवारी आता 92 टक्केर्पयत गेली आहे. अर्थात सरासरीचा तीन टक्के पाऊस आठवडाभरात झाला आहे. नवापूर तालुक्यात तीन दिवसांपूर्वी अतिवृष्टीच

नंदुरबार : परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात दिरंगाई होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आधीच अनियमित पावसामुळे यंदा उत्पादकता घटलेली असतांना आता हातातोंडाशी आलेला घास देखील लहरी निसर्गाने हिरावल्याने शेतक:यांमध्ये चलबिचलता निर्माण झाली आहे. दरम्यान, शुक्रवार्पयत महसूल कर्मचा:यांचा संप सुरू होता, त्यामुळे पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. यंदा परतीच्या पावसाने चांगलाच कहर केला. गेल्या आठवडय़ापासून अनेक भागात कमी अधीक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाचा रब्बी पिकांना फायदा होणार असला तरी खरीपाचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे तातडीने होणे आवश्यक असतांना आठ दिवस होण्यात आले तरी पंचनाम्यांबाबत काहीही हालचाली नसल्याचे चित्र आहे.नंदुरबार जिल्ह्यात यंदा ऑक्टोबर अखेर सरासरी 89 टक्के पाऊस झाला होता. गेल्या वर्षाच्या तुलनेत सरासरी पाच टक्के पाऊस अधीक आहे. असे असले तरी अनियमितता आणि काही भागातच पावसाचा अधीक जोर यामुळे अनेक भागात खरीपाची स्थिती वाईट होती. त्यामुळे विविध पिकांची उत्पादकता देखील कमी झाली आहे. ही बाब लक्षात घेता शेतक:यांनी जेमतेम नियोजन केलेले असतांनाच परतीचा पावसाने ते नियोजन देखील आता कोलमडले आहे. जिल्ह्यात यंदा कापसाचे क्षेत्र सर्वाधिक अर्थात 80 हजार हेक्टर  र्पयत आहे. त्यामुळे परतीचा  पावसाचा सर्वाधिक फटका हा  कापूस या पिकाला बसला आहे. वेचणीवर आलेला कापूस पावसामुळे ओला झाला. परिणामी त्या कापसाची प्रतवारी देखील कमी झाली. त्याचा फटका भाव कमी होण्यात झाला. हंगाम सुरू झाल्यानंतर सुरुवातीलाच चार हजारार्पयत भाव खेतिया बाजार समितीत मिळाला होता. स्थानिक ठिकाणी देखील याच भावात कापूस खरेदी केली जात होती. परंतु पावसात भिजल्यामुळे कापूस तीन ते साडेतीन हजार रुपये क्विंटलर्पयत घसरला आहे. याशिवाय काढणीवर आलेल्या भाताचेही  नवापूर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. सोयाबीन, मका, उडीद या पिकांनाही फटका बसला आहे. वादळवारा आणि जोरदार पाऊस यामुळे पपई आणि केळीचेही नुकसान शहादा व नंदुरबार तालुक्यात झाले आहे. यामुळे शेतक:यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे, ते नुकसान भरून काढणे मोठे जिकरीचे ठरणार आहे.पंचनामे तातडीने करावेनुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात यावे अशी मागणी विविध भागातील शेतक:यांनी केली आहे. परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. वेध शाळेने पावसाचा अंदाज 14 ऑक्टोबर्पयत वर्तविला होता. त्यामुळे पंचनामे लांबल्याचे बोलले जात आहे.याशिवाय महसूल कर्मचा:यांच्या संपामुळे देखील पंचनामे होऊ शकले नसल्याचे समजते. सोमवारपासून पंचनामे सुरू होणार असून तातडीने अहवाल राज्य शासनाला कळविण्यात येणार आहे.