शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

तळवेत श्रमदानातून नदी खोलीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 20:25 IST

दोधाळ नदीपासून सुरूवात : गावाचा उत्साह पाहून परिसरातील नागरिकांचाही सहभाग

तळोदा : तालुक्यातील तळवे येथील गावकऱ्यांनी आपल्या परिसरातील सर्व नद्या नाल्यांचे खोली करणाचे काम हाती घेतले असून, या कामाचा शुभारंभ शनिवारी गावलगतच्या दोधाळ नदीपासून करण्यात आला. हे काम लोकसहभागातून सुरू करण्यात आले आहे. तळवेकरांचे हे स्तुत्य काम पाहून आमलाड, मोरवड गावामधील रहिवाशांनीदेखील हातभार लावण्याचा निर्णय घेतला आहे.गेल्या पाच ते सहा वर्षापासून सातत्याने पावसाच्या प्रमाणात घट होत आहे. त्यातच नद्या-नाल्यांच्या खोलीकरणाअभावी त्यातील सर्वच पाणी वाहून जात आहे. पावसाळ्यात पुराच्या पाण्याने महिनाभर वाहनारे नदी-नाले अलीकडे एका दिवसातच कोरडे ठास पडत असतात. साहजिकच जलपुनर्भरणाअभावी भूगर्भातील पाण्याची पातळी प्रचंड खालावत चालली आहे. ७० ते ८० फुलावरील पाण्याची पातळी यंदा तर २०० ते २५० फुटावर गेली आहे.ही सर्व प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेवून तालुक्यातील तळवे येथील गावकऱ्यांनी आपल्या गावालगतच्या दोधाळ नदी बरोबरच परिसरातील सर्व नदी नाल्यांचा खोलीकरणाचा निर्णय घेतला. यात गावातील तरूणांचाच अधिक आग्रह होता. त्यानुसार या तरूणांनी गावात फिरून गावकºयांकडून या कामासाठी साधारण अडीच लाखाची लोकवर्गणी जमा केली. याशिवाय प्रति एकरी शेतकºयांकडून वर्गणीदेखील जमा करण्यात आली आहे.या कामाचा शुभारंभ शनिवारी गावाजवळील दोधाळ नदीत पोकलॅण्ड मश्ीनाची पूजा ज्येष्ठ नागरिक गोविंदराव गागरे, विजय मुरार पाटील यांच्या हस्ते करून करण्यात आला.या वेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष निरज पाटील, पोलीस पाटील भरत पाटील, सरपंच कृष्णा पाडवी, उपसरपंच मंगेश तनपूरे, ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र पाडवी, शरद पाडवी, सचिन पाटील, शांतीलाल गायकवाड, तंटामुक्ती समितीचे कांतीलाल साळुंखे, अनिल रतिलाल पाटील, नवनाथ ठाकरे, मोग्या भिल, संजय तनपूरे, राजेश पाटील, गोटू कलाल, उमेश पाटील, ईश्वर पाटील आदींसह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.