लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : साथीचे आजार लक्षात घेता नागरिकांनी सतर्क राहावे. पालिकेतर्फे उपाययोजना करण्यात येत असून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. दरम्यान, डेंग्यूवर ब:यापैकी नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी वारंवारच्या वातावरणातील बदलामुळे विविध आजारांची साथ सुरूच असल्याची स्थिती आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने हैराण करून सोडले होते. आरोग्य विभाग आणि पालिकेने विविध उपाययोजना केल्या असल्यातरी डेंग्यूची साथ पूर्णपणे संपली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनीही उपाययोजना कराव्या व साथीच्या आजारांपासून दूर राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. डासांमुळे मलेरिया, डेंग्यु, चिकनगुनिया, हत्तीरोग आणि मेंदुज्वरसारखे आजार होतात. ते थांबविण्यासाठी नागरिकांनी दक्षता घ्यावी व आठवडय़ातुन एक दिवस कोरडा पाळावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे. सर्वत्र पावसाचे वातावरण असल्यामुळे ब:याच ठिकाणी केर-कचरा साचतो. तसेच गटारीत कचरा साचल्यामुळे त्या बंद पडतात. या साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होते व त्यापासून डेंग्यु, मलेरिया तसेच अन्य साथिचे आजार पसरत असतात. त्याचप्रमाणे घराच्या छतावर किंवा अडगळीत पडलेल्या वस्तुंमध्ये पाणी साचते. घरातील माठ, डब्बे, टायर, कुलर आणि फुलदाण्यांमध्ये पाणी साचलेले राहते. अशा ठिकाणाहून डासांचे प्रजनन होऊन डेंग्यू, मलेरिया तसेच विविध प्रकारच्या साथिच्या रोगाची लागण होते व आजार पसरतात. या आजारांपासून बचाव करण्यासाठी प्रत्येकाने एक कोरडा दिवस पाळावा. असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. ासांची उत्पत्ती थांबविण्यासाठी घरातील पाण्याची भांडी कोरडी करून स्वच्छ ठेवावेत.
डेंग्यू येतोय नियंत्रणात साथीचे आजार मात्र कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 12:29 IST