लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अतीवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्यात येऊन भरपाई देण्याची मागणी नर्मदा बचाव आंदोलनतर्फे करण्यात आली़ सोमवारी नर्मदा बचाव आंदोलनच्या कार्यकत्र्यानी जिल्हाधिकारी यांच्या दालनासमोर घोषणाबाजी करत निदर्शने केल़े यावेळी नर्मदा बचावतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात, नर्मदा खो:यातील 33 गावे व 14 पुनर्वसन वसाहतीत पुनर्वसन पूर्ण झाले नसताना बेकायदेशीरपणे धरणात पाणी साठवले गेल़े जून 2019 पासून राज्यात मुसळधार पाऊस, अतीवृष्टी व निकासाची व्यवस्था नसल्याने जिल्ह्यातील बाधितांची शेतीही बुडाली़ अनेक शेतक:यांची शेती वाहून गेली़ तसेच अनेक ठिकाणी शेतीचे नुकसान झाले आह़े कालांतराने अवकाळीमुळेही पिकांची हानी झाली आह़े यामुळे जिल्ह्यातील पावसाळ्यातील शेतीच्या नुकसानीचे पंचनामे योग्य त्या पद्धतीने करुन योग्य ती नुकसान भरपाई देण्याचे नियोजन करावे, आरसीईपी कराराला पुढे जाऊ देऊ नये, देशातील अर्थव्यवस्था शेती व ग्रामीण भागावर विपरीत परिणाम होणार आह़े यातून आसीईपी करार त्वरीत रद्द करण्यासाठी केंद्र सरकारकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात यावा, जिल्ह्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे हे जलदगतीने करुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहिर करावा, सरदार सरोवराची पातळी सर्व नियम, कायदे धाब्यावर बसवून प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 138़68 मीटर पूर्ण भरल्यामुळे शेकडो घरे टापू, बुडीतात आली व शेकडो हेक्टर शेती पाण्यात गेली आह़े त्यापैकी ज्यांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ त्यांना भरपाई तसेच पंचनामे पूर्ण नसल्यास ते करण्याची आदेश देण्याची मागणी करण्यात आली आह़े यावेळी कांतीलाल पावरा, किरसिंग वसावे, ओरसिंग पटले, चेतन साळवे, लतिका राजपूत, कृष्णा पावरा, सिमजी पावरा, मान्या पावरा, हिरालाल पावरा, लालसिंग वसावे, कालुसिंग पाडवी यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होत़े
नर्मदा बचावची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2019 12:54 IST