या वेळी सरपंच कविता पाटील, उपसरपंच पवन माळी, सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील, पोलीस पाटील दिनेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य वासुदेव माळी, पुंडलिक ठाकरे, नीलाबाई राजपूत, अनिताबाई सोनवणे, माधुरी पाटील, स्वाती पाटील, कमलबाई महाजन, संगीता भिल, ग्रामसेविका योगिता न्हावी आदींसह शेतकरी बांधव उपस्थित होते. या वेळी मंडळ अधिकारी पाटील यांनी सांगितले की, तलाठी पीक पाहणीसाठी शेती शिवारात उपस्थिती देऊन पीक पाहणी करीत होते. परंतु सध्या बदलत्या काळात आपली पीक पाहणी स्वतः शेतकरी करेल या अनुषंगाने शासनाने अमृत महोत्सवापासून ई-पीक पाहणी ॲप सुरू केले आहे. यात आपल्या शेतातील पिकांचा आपणच फोटो काढून अपलोड करून नोंदणी करावी. त्यानंतर आपला सातबारा उतारा काढता येईल. माझ्या शेताचा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा, ही योजना यशस्वी करा, असे आव्हान मंडळाधिकारी पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
अनरद येथील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:35 IST