क्षमतेपेक्षा आधिक प्रवासी
नंदुरबार : तालुक्यातील नागरिक कामानिमित्त व विद्यार्थी उच्चशिक्षण घेण्यासाठी ग्रामीण भागातून नंदुरबार येथे शाळा व महाविद्यालयात येत असतात. बसमध्ये जास्त प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत असल्याने ऐकमेंकामध्ये सामाजिक अंतर कसे ठेवायचे, असा प्रश्न निर्माण होत असून एस.टी महामंडळाने जादा बसेस सोडाव्यात,अशी मागणी होत आहे.
गटारीचे खड्डे ठरताहेत त्रासदायक
नंदुरबार : शहरातील सांडपाणी गटारी पाइपलाइनची कामे रस्त्याच्या खालून करण्यात आले आहे. गटारीतील गाळ तसेच कचरा काढण्यासाठी गटारीचे झाकण रस्त्याच्या मधोमध तयार करण्यात आले आहेत. वाहनधारक रस्त्यातील खड्डे टाळायच्या प्रयत्न करताना अपघात घडत आहे. वाहनधाराकांमध्ये पालिका प्रशासनाच्या कामाबद्दल रोष व्यक्त करण्यात येत आहे. पालिका प्रशासनाने रस्त्यावरील झाकणाची उंची वाढवून दुरुस्ती करण्यात यावी,अशी मागणी होत आहे.