शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

खापरखेडा लघु प्रकल्पाची दुरुस्ती करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:29 IST

शहादा तालुक्यातील महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या खापरखेडा धरणातील गाळ काढून विहीर व गेट दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ...

शहादा तालुक्यातील महत्त्वाचा लघु प्रकल्प असलेल्या खापरखेडा धरणातील गाळ काढून विहीर व गेट दुरुस्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन शिवकृपा पाणीवाटप संस्था व ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहे. या निवेदनात परिसरातील शेतकऱ्यांना जीवनदायी ठरणाऱ्या खापरखेडा येथील लघु प्रकल्पाची निर्मिती १९७० ते १९७२ च्या काळात झाली. या प्रकल्पातून परिसरातील सुमारे ६०० हेक्टर क्षेत्र बागायतीखाली येत असल्याने प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पातून कोंढावळ, जयनगर, वडाळी या गावातील शेतकऱ्यांना लाभ झाला. मात्र, अनेक वर्षांपासून धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून त्याचा परिणाम पाणी साठवणुकीवर झाला. यामुळे ६०० हेक्टर क्षेत्रापैकी फक्त १५० ते २०० हेक्टर क्षेत्राला लाभ होत आहे. यामुळे इतर शेतकऱ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची पातळीही खालावली जाते. गेल्या तीन वर्षांपासून मुख्य कूपनलिका गाळामुळे बंद आहे. म्हणून शेतकऱ्यांना रबी हंगामासाठी पाणीपुरवठा होत नसल्याचे या निवेदनात म्हटले आहे. शिवकृपा पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष लालचंद माळी, शेतकरी राकेश हिरामण देवरे, लक्ष्मण माळी, निंबा काशिनाथ वैराळे, निखिल लालचंद माळी, सुरेश बुधा माळी, हिरामण विठ्ठल माळी आदींनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

खा. डॉ. हीना गावित आज धरणाची पाहणी करणार

कोंढावळ, जयनगर, वडाळी परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी ठरणाऱ्या कोंढावळ येथील धरणाच्या दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन खा.डॉ.हीना गावित यांना दिले होते. त्यांनी तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष धरणाची पाहणी करण्यासाठी व ग्रामस्थांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी रविवारी खा.डॉ.हीना गावित व आ. डॉ.विजयकुमार गावित भेट देणार असल्याची माहिती शिवकृपा पाणी वाटप संस्थेतर्फे देण्यात आली.

भूकंपाच्या धक्क्यामुळे धरण झाले खाली

२ जानेवारी रोजी कोंढावळसह परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसल्याने धरणाला गळती लागली आहे. त्यामुळे १५ दिवसांतच धरणात पाण्याचा जो साठा होता तो नदीत पूर्णपणे वाहून गेला. त्यामुळे संपूर्ण धरण कोरडे पडले आहे. परिणामी यावर्षी शेतकऱ्यांचा रबी हंगाम पूर्णतः वाया गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन हवालदिल झाला आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे शेतकरी आनंदित होते. मात्र, धरणाला गळती लागल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.