शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर घरपट्टी कमी करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2018 11:14 IST

तळोदा : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना पालिकेने घरपट्टीत प्रचंड वाढ केली आहे. शिवाय घरपट्टी आकारतानादेखील मोठा दुजाभाव करण्यात आला ...

तळोदा : यंदा दुष्काळी परिस्थिती असताना पालिकेने घरपट्टीत प्रचंड वाढ केली आहे. शिवाय घरपट्टी आकारतानादेखील मोठा दुजाभाव करण्यात आला आहे. त्यामुळे ही वाढीव घरपट्टी कमी करावी यासाठी शुक्रवारी येथील शिवसेनेतर्फे पालिकेच्या अधिका:यांना साकडे घालण्यात आले आहे. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.यासंदर्भात सेनेच्या नगरसेविका प्रतीक्षा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या पदाधिका:यांनी शुक्रवारी पालिकेचे कार्यालयीन अधीक्षक विजय सोनवणे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांना निवेदन देण्यात आले. यंदा संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशी वस्तुस्थिती असताना येथील नगरपालिकेने नागरिकांच्या मालमत्तांचे पुनमरुल्यांकन केले आहे. तसेच हे मूल्यांकन करताना तब्बल 24 टक्के घरपट्टीत वाढ केली आहे. या मूल्यांकनातही कर्मचा:यांनी अक्षरश: दुजाभाव केला आहे. कारण एक हजार 200 स्क्वेअर फूट असलेल्या घराची घरपट्टी दीड हजार रुपये तर दोन हजार स्क्वेअर फूट असलेल्या घरांची घरपट्टी फक्त एक हजार रुपये आकारण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या या आकारणीबाबत नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.शासनाच्या वाढीव मालमत्ता कराबाबत सव्रे करणे आवश्यक होते. तसे न करता पालिकेने सरसकट वाढ करून एकप्रकारे नागरिकांच्या माथी आर्थिक भरुदड लादला आहे. पालिकेने 24 टक्के घरपट्टी वाढविली आहे  ती कमी करून दहा टक्के करण्यात यावी. त्याचबरोबर घरपट्टी भरण्याची अल्प मुदत ठेवली. ती वाढवावी अन्यथा शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला़ या वेळी तालुका प्रमुख प्रकाश कुलकर्णी, शहर प्रमुख जितेंद्र दुबे, विनोद वंजारी, जगदीश चौधरी, श्रावण तिजबीज, जयेश सूर्यवंशी, काशीनाथ कोळी, इम्रान शेख, विजय मराठे, नितू सोनार, किशोर कुंभार आदी उपस्थित होते.