शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

असलोद परिसरात पाणीटंचाई, रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 13:13 IST

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

असलोद : शहादा तालुक्यातील पूर्व भागातील असलोदसह मंदाणे परिसरात यंदा अत्यल्प पाऊस झाल्यामुळे दुष्काळ सदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याअभावी पिके जेमतेम तग धरून असल्याने उत्पन्नात कमालीची घट येणार     आहे. त्यामुळे प्रशासनाने आतापासून प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे.तालुक्यातील पूर्व भागात कापूससह मूग, मका, बाजरी, सोयाबीन व पपईची मोठय़ा प्रमाणात लागवड करण्यात आली होती. परंतु पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याने पिकांना पूर्ण क्षमतेने पाणी न मिळाल्याने हंगाम हातातून गेल्यातच जमा आहे. दिवाळीनंतर शेतशिवार रिकामे दिसून येणार असून, विहिरी, नदी-नाल्यांसह धरणांमध्ये पूर्ण क्षमतेचा जलसाठा नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. दुष्काळाने आतापासूनच आपले रौद्ररुप दाखवण्यास सुरूवात केली असून, येणा:या काळात परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. दरवर्षी या भागातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. यंदा  तर पुरेशा प्रमाणात पजर्न्यमान न          झाल्याने पाणीप्रश्न गंभीर बनणार आहे. काही गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाई जाणवू लागली असल्याने येणा:या उन्हाळ्यात गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रशासनाने आत्तापासूनच ठोस उपाययोजना करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मजुरांचे स्थलांतररोजगारासाठी ग्रामीण भागातून मोठय़ा प्रमाणात मजूरवर्ग गुजरात, मध्य प्रदेश व सौराष्ट्रात जात आहेत. परिसरातील दुधखेडा, लोंढरे या धरणात जेमतेम पाणीसाठा असल्याने शेतीला पाणी मिळणार नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रोजगारही कमी होणार असल्याने मजुरांनी आतापासून स्थलांतर सुरू केले आहे. यंदाच्या हंगामात भारनियमनाचाही फटका शेतक:यांना सहन करावा लागत आहे. पाण्याअभावी पिकांवर झालेला खर्च निघणेही मुश्कील झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.शासनातर्फे दुष्काळ सदृष्य तालुक्यांमध्ये महसूल व कृषी विभागाकडून शेतशिवारात जावून अधिकारी व कर्मचारी माहिती जाणून घेत आहेत. असलोद येथे तहसीलदार मनोज खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी एस.आर. लहाने, तलाठी सुरेखा राठोड, कृषी पर्यवेक्षक कोळी यांनी शेतात जावून पाहणी केली. या वेळी शेतकरी उपस्थित होते. शासनानेदेखील लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.