शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दामळदा ग्रामस्थांनी केला 50 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील दामळदा येथे ग्रामपंचायत, ग्रामस्थ व पाणी फाऊंडेशन यांच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहावे याकरिता जलदिनाचे औचित्य साधून गावातून भव्य रॅली काढण्यात आली. या वेळी उन्हाळ्यात पाण्याच्या नियोजनाकरीत ग्रामस्थांनी 50 हजार वृक्ष लावण्याच्या संकल्प केला.                              शहादा तालुक्यात गेल्या पाच वर्षापासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालले आहे. त्यामुळे नदी, नाले, धरण व तलावासह बंधारे डिसेंबर महिन्यातच कोरडे होऊ लागलेल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी खालावत असल्याने कूपनलिका बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बागायत शेतीच्या प्रमाणातही घटत होत आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासह वापरण्यासाठी लागणा:या पाण्याचे हे दुर्भिक्ष जाणवत असून, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील गंभीर होत आहे. उन्हाळ्यात येथील तापमान उच्चांक गाठणारा असून, 45 डिग्री पेक्षा जास्त तापमान मे महिन्यार्पयत राहणार असल्याने त्याची झळ नागरिकांना पोहोचणार आहे. दामळदा येथ ‘चला कामाला लागुया’ पान लोटचे काम करूया, माती आडवा पाणी जिरवा याप्रमाणे ग्रामपंचायत व पाणी फाऊंडेशनच्या वतीने पर्यावरण संतुलीत राहण्याकरिता गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली.ग्रामपंचायत सरपंच हरेरामाकृष्ण मालचे, उपसरपंच डॉ.विजय नामदेव चौधरी, माजी पोलीस पाटील प्रवीण मंगेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत सजन पाटील, तुंबा मकरंद पाटील, शहीद भगतसिंग गणेश मंडळाचे भरत महाजन, रंजना  पाटील, द्वारकाबाई माळी, मुख्याध्यापिका मनीषा पाटील,  करुणा पाटील, योगेश पाटील, गणेश पाटील, ग्रामसेवक आर.एस.रांगणगावकर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा व माध्यमिक शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक वृंद गावातील लहान मुलांपासून वृद्ध माणसांर्पयत सर्वानी पर्यावरण रॅलीत सहभाग नोंदवला आहे. गावातील महादेव मंदिर येथून रॅलीला सुरुवात करण्यात आली. पाणी फाउंडेशन यांच्या सहकार्याने जल दिवसाचे अवचित्त साधून पर्यावरण बचाव रॅलीमध्ये ेग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. पाणी आडवा, पाणी जिरवा बाबत पाणी फाऊंडेशनचे समन्वयक गुणवंत पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ग्रामस्थांच्या प्रत्येक कुटुंबाने दोन झाडे लावावीत असा निर्धार करण्यात आला आहे. पर्यावरण टिकले तरच पाण्याची बचत होईल. येणा:या पावसाळ्यार्पयत  50 हजार झाडे लावण्याचा निर्धार ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. पाणी अडवण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात  आले आहे. कच्चा बंधारा, पावसाळ्यातील वाहून जाणारे पाणी अडवण्यासाठी शोषखड्डे लोकसहभागातून तयार करण्यात येत आहे. शेतात असलेल्या पालापाचोळ्याच्या खतासाठी उपयोग करण्यात यावा तसेच गुराढोरांच्या चा:यासाठी आतापासूनच नियोजन करण्यात यावे असे या वेळी ठरविले.