बसस्थानकात प्रवाशांची तारांबळ
शहादा : शहरातील बसस्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले असून, उभे राहण्यासाठीही प्रवाशांना जागा शिल्लक राहिलेली नाही. दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने प्रवाशांची मोठी तारांबळ उडत आहे. महामंडळ प्रशासनाने बसस्थानकातील पाणी बाहेर काढण्याची व्यवस्था करावी, अशी प्रवाशांची मागणी आहे.
साधना विद्यालयात वृक्षारोपण
नंदुरबार : शनिमांडळ (ता. नंदुरबार) येथील साधना विद्यालयात राष्ट्रसंत भगवान बाबा जयंती सप्ताहानिमित्ताने देवीदास पेटकर यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी युवराज भाबड, रवी कासे यांनी रोपे दिली. यासाठी आर. के. गाभणे, विजय प्रधान व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
मिशन प्रा. शाळेत स्वच्छता पंधरवडा
नंदुरबार : एस. ए. मिशन प्राथमिक शाळेत आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस साजरा करण्यात आला तसेच स्वच्छता पंधरवड्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आली. त्यात हात धुवा, परिसर स्वच्छता व वैयक्तिक स्वच्छता या स्पर्धांचा समावेश होता. तसेच आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष मुख्याध्यापिका सुषमा पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा घेण्यात आल्या.