निवेदनात, राणीपूर गावाला लागून असलेल्या नदीवर जुना पूल आहे. हा पूल जीर्ण झाला आहे. पुलावर खड्डे पडले आहेत. वाहतुकीसाठी हा पूल अरुंद ठरत आहे. या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात यावा यासाठी राणीपूर येथील ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. या ठिकाणी नवीन पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती आहे; परंतु अद्याप बांधकाम सुरू झालेले नाही. यामुळे जुन्या पुलाचा वापर सुरू आहे. राणीपूर येथे शासकीय आश्रमशाळा असून विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याचा त्रास होत आहे. पावसाळ्यात सातपुड्यातून तळोद्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर मर्यादा येते. विद्यार्थी व ग्रामस्थांना हे अडचणीचे ठरत असल्याने या ठिकाणी तातडीने पुलाची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी संघटनेचे नंदुरबार जिल्हा प्रवक्ता गणपत पाडवी, उपाध्यक्ष उमेश वसावे, शहराध्यक्ष विनोदा पाडवी, मोग्या ठाकरे, मुकेश पाडवी, सहसचिव दिनेश पाडवी, आदी उपस्थित होते.
राणीपूर येथे नवीन पूल निर्माण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST