शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गुर्जर महासभेच्या अध्यक्षपदी दिपक पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या पुष्कर (राजस्थान) येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अखिल भारतीय गुर्जर महासभेच्या पुष्कर (राजस्थान) येथे झालेल्या सर्वसाधारण सभेत सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.बैठकीच्या प्रारंभी माजी अध्यक्ष स्व.रामसरण भाटी यांच्यासह समाजातील कोरोना योद्धा यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी म्हणून माजी आमदार गोपीचंद गुर्जर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी उपस्थित असलेल्या कार्यकारणी सदस्य व कोरोना साथीच्या आजारामुळे उपस्थित नसलेले सदस्यांची मते दूरध्वनीने जाणून घेतले. त्यानंतर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दीपक पुरुषोत्तम पाटील यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित केली. यावेळी एकमताने सुरेंद्रकुमार नागर, (खासदार, राज्यसभा) यांना गुर्जर महासभेचे संरक्षक बनवले गेले. राष्ट्रीय अध्यक्ष .पाटील यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या पदाधिका-यांची घोषणा केली.राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी गोपीचंद गुर्जर, नेपालसिंग कसाना, सरचिटणीस म्हणून मुकेश गुर्जर, अहमदाबाद, बच्चूसिंह गुर्जर जयपुर, रामकिशोर दोगणे यांना मध्य प्रदेशच्या अध्यक्षांची जबाबदारी कायम करण्यात आली. यावेळी राजस्थान कार्यकारिणीचे अध्यक्ष रामप्रसाद धाबाई यांनी सर्व पाहुण्यांचे पुष्पहार व शाल देऊन स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष कायदा प्रकोष्ठ अ‍ॅड.रमेश धाबाई, अजमेर जिल्हा अध्यक्ष नथुलाल बजाड, अखिल भारतीय वीर गुर्जर सुधार समिती अध्यक्ष हरचंद पटेल, रामअवतार गुर्जर नसीराबाद, शिवप्रकाश खटाणा, भागचंद चोपडा, गोपालकृष्ण डोई ,गोपाल गुर्जर, जगदीप गुर्जर, किशन पंचोली, गोपाल कटारिया, नौरतम गुर्जर, गिरधारी कालस, ओमप्रकाश गुर्जर, दीपक रावत, महावीर गुर्जर, नारायण खोडवा, महावीर फौजी, भगवान सिंह खटाणा उपस्थित होते. दीपकभाई पाटील हे श्री सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष असून लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ, श्री पी.के.अण्णा पाटील फाऊंडेशन, शहादा याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी यापूर्वी नंदुरबार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तसेच शहादा पंचायत समितीचे सभापती पदाची धुरा यशस्वीपणे संभाळली आहे. याशिवाय राज्य व जिल्हा स्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थावर विविध पदे भूषवली आहेत.