शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
2
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
3
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
4
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
5
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
6
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
7
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
8
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
9
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
10
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
11
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
12
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
13
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
14
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
15
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
16
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
17
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
18
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
19
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
20
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ

पाच रुग्णवाहिकांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : माझगाव डाॅकच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी पाच रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : माझगाव डाॅकच्या सामाजिक दायित्व निधीतून जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी पाच रुग्णवाहिका प्राप्त झाल्या आहेत. या रुग्णवाहिका जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड आणि माझगाव डॉकच्या सामाजिक दायित्व निधीचे    उपव्यवस्थापक रोहित पांड्या यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सुपूर्द करण्यात आल्या. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ. भारुड म्हणाले, आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील आरोग्य     सुविधा अधिक सक्षम करण्याचा   प्रयत्न करण्यात येत आहे. सामाजिक दायित्व निधीतून यापूर्वी ११ रुग्णवाहिका देण्यात आल्या असून   या ५ रुग्णवाहिकांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा देता येईल. दुर्गम भागातील तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनाही चांगले वाहन देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवेसाठी    माझगाव डॉक तर्फे यापुढे देखील सहकार्य    करण्यात येईल, असे पांड्या यांनी यावेळी सांगितले. आज प्राप्त झालेल्या ५ रुग्णवाहिकांसाठी माझगाव डॉककडून ५२ लाख ५० हजाराचा निधी प्राप्त झाला होता. यापूर्वी १ कोटी २४ लाख खर्च करून ११ रुग्णवाहिका घेण्यात आल्या आहेत. या रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची वाहतूक करण्यास मदत होणार     आहे. दोन शववाहिन्यादेखील मंजूर करण्यात आल्या असून त्या येत्या काळात प्राप्त होणार आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.यावपूर्वी देखील २६ जानेवारी रोजी ११ रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.