शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 12:26 IST

महावितरणकडून धाडसत्र : दंड न भरणा:यांवर गुन्हे दाखल करण्याची गरज

नंदुरबार : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली आह़े एप्रिल 2016 ते ऑक्टोबर  2017 र्पयत वीज चोरीच्या 379 घटना घडल्या आहेत़ यातून सुमारे 50 लाखांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आह़ेहीच आकडेवारी मागील वर्षी 811 इतकी होती़ गेल्या वर्षभराच्या तुलनेत यंदा महावितरणच्या कारवाईमुळे विजचोरांवर चाप बसला असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे वीज चोरांविरोधात प्रशासनाने आपली कंबर कसली असल्याचे दिसून येत आह़ेगेल्या वर्षभरात वीज चो:यांच्या प्रकरणांमध्ये होणारी वाढ ही वीज वितरण कंपनीच्या पुढे चिंतेची बाब म्हणून समोर आली  होती़ जिल्ह्यात वाढत्या वीज चो:यांच्या प्रकरणांमुळे प्रशासनासमोर मोठय़ा प्रमाणात अडचणी निर्माण  होत आह़े त्यामुळे याकडे लक्ष देत वीज वितरण कंपनीकडून वीज चोरटय़ांविरोधात धाडसत्र सुरू करण्यात आले आह़े कंपनीच्या अधिका:यांकडून वीज चोरांसंदर्भात धडक कारवाई करण्यात येत आह़े  तसेच यांच्यावर दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत आह़े दरम्यान, गेल्या दोन वर्षाच्या   वीज चो:यांच्या घटनांचा आलेख बघता यंदाच्या वर्षात वीज  चो:यांच्या घटनांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े  2014-2015 या वर्षात नंदुरबार विभागातर्फे 254 वीज चो:यांची प्रकरणे पकडण्यात आली होती़ यातील 145 ग्राहकांकडून 19 लाख रुपयांची रक्कम दंडापोटी  वसूलही करण्यात आली होती़तसेच 2015-2016 या आर्थिक वर्षात वीज चो:यांच्या प्रकणांमध्ये तीनपटीने वाढ होत तब्बल 811 वीज चोरीच प्रकरणे पकडण्यात आली आह़े  यातून 382 ग्राहकांकडून 25 लाख रुपयांची वसुली करण्यात आली़ त्यामुळे वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ होत असल्याचे यातून दिसून येत आह़े  परंतु यंदाच्या आर्थिक वर्षात पुन्हा विजचोरीच्या प्रकरणांमध्ये घट झाली असल्याचे दिसून येत आह़े दरम्यान, वीज चोरीच्या प्रकरणांमध्ये ग्राहकांकडून दंड भरण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे वीज वितरण कंपनीकडून सांगण्यात आले  आह़े यातून वीजकंपनीचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान होत आह़े त्यावर वीज वितरण कंपनीकडून  दंड न भरणा:यांवर गुन्हे नोंदवण्याची कारवाईसुद्धा करण्यात येत आह़ेशासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांमध्ये थकबाकीची वसुली करून आपापले टार्गेट पूर्ण करण्याच्या कामांना  वेग आला आह़े दररोज गावोगावी वसुलीसाठी फिरावे लागत असल्याने कर्मचा:यांची यातून मोठय़ा प्रमाणावर धावपळ होत असल्याचे कर्मचा:यांकडून सांगण्यात येत आह़े त्यामुळे याचा बोजा कर्मचा:यांवर पडत असून आरोग्यावर याचा दुष्परिणाम होत आह़े