शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

योग्य भाव न मिळाल्यास पपई तोड बंद करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 13:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पपई उत्पादक संघर्ष समिती व पपई व्यापारी यांची शुक्रवारी संयुक्त बैठक शहादा तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत पपईच्या दराबाबत योग्य तोडगा न निघाल्याने २६ जानेवारीपासून पपई तोड थांबविण्याचा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीच्या सदस्यांनी घेतला आहे. पपईला योग्य भाव न मिळाल्यास पपई रस्त्यावर फेकू, असा निर्णयही शेतकऱ्यांनी घेतला आहे.उत्तर भारतात व्यापारी पपई प्रती किलो ४० ते ५० रुपये दराने विक्री करीत आहेत. त्यामानाने शहादा तालुक्यातील पपई व्यापारी हे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देत नाहीत. गेल्या काही वर्षापासून अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खालावल्याने बागायत शेती करणे शेतकºयांना अवघड झाले आहे. परिणामी मोजकेच शेतकरी पपईची लागवड करीत होते. उत्पन्न कमी निघत असल्याने पपईला व्यापारी योग्य भाव देत होते. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक होते म्हणून पपईचे क्षेत्र वाढून उत्पादनही वाढले आहे. सद्यस्थितीत दिल्ली, हरियाणा, जम्मू-काश्मीर आदी ठिकाणी थंडीने कहर केला आहे. त्यामुळे या भागात पपईला मागणी वाढली आहे. उत्तर भारतातील बाजारपेठेत पपईला प्रती किलो सध्या ५० रुपयांपेक्षा जास्त भाव मिळत आहे. शहादा तालुक्यात दोन महिन्यापासून व्यापाºयांनी पपईची तोड सुरू केली आहे. सुरुवातीला २२ रुपये प्रती किलो दराप्रमाणे तोड सुरू केली. मात्र नंतर दर कमी करत करत साडेसात रुपयांपर्यंत आणून ठेवल्याने होणारा विरोध पाहता पुन्हा साडेदहा रुपये किलो दराने तोड सुरू केली. परंतु पपईला किमान १४ रुपये प्रती किलो दर मिळावा, अशी शेतकºयांची मागणी आहे.गेल्या काही दिवसापासून पपई उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्यात दराबाबत रस्सीखेच सुरू होती. त्यावर योग्य निर्णय व्हावा म्हणून शेतकरी व व्यापाºयांची शुक्रवारी सकाळी तहसील कार्यालयात तहसीलदार मिलिंद कुलकर्णी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हेमंत चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक झाली. बैठकीत तहसीलदार कुलकर्णी यांनी सांगितले की, शेतकºयांना कच्चामाल उत्पादन करण्याकरिता आर्थिक व मानसिक या श्रमातून जावे लागते. बºयाचवेळा पिकांसाठी लागलेला खर्चही निघत नाही. त्यामुळे व्यापारी व शेतकरी यांच्यात ‘गिव्ह अँड टेक’ याप्रमाणे व्यापार होऊन दोघांमध्ये समन्वय साधून पपई दर निश्चित केले पाहिजे. यात कुणाचेही शोषण होऊ नये, अशी समन्वयाची भूमिका असावी, असे सांगितले. परंतु शेतकºयांनी आम्हाला योग्य भाव मिळाला तरच आम्ही पपई तोड करू देऊ अन्यथा दर निश्चित न झाल्यास २६ जानेवारीपासून पपई तोड बंद करण्यात येईल, असा निर्णय पपई उत्पादक संघर्ष समितीचे भगवान पाटील, उमाकांत पाटील, हिरालाल माळी, विश्वनाथ पाटील, दिलीप पाटील, संदीप पाटील, ऋषीकेश चौधरी, राजाराम पाटील, गणेश मराठे, जयेश मराठे, मयूर पाटील, योगेश्वर पाटील, महेश सूर्यवंशी, निलेश पाटील यांच्यासह अनेक शेतकºयांनी घेतला आहे.