लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहादा तालुक्यातील जावदे येथील एकाच्या बँक खात्यातून 48 हजार रुपये काढून घेत फसवणूक केली़ 30 सप्टेंबर रोजी हा प्रकार घडला होता़ राजेंद्र बळीराम पाटील यांच्या बँक खात्यातून 48 हजार 480 रुपये काढल्याचा संदेश त्यांना मिळाला होता़ बँकेत तपास केला असता, त्यांना खात्यातून पैसे काढण्यात आल्याचे दिसून आल़े राजेंद्र पाटील यांनी शहादा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आह़े तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश तमखाने करत आहेत़
शहाद्यातील एकाची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2019 12:34 IST