शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खोंडामळी व नांदर्खेपासून कर्जमुक्तीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 13:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नांदर्खे आणि खोंडमळी गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील नांदर्खे आणि खोंडमळी गावातील पात्र शेतकऱ्यांची यादी आज प्रसिद्ध करण्यात आली. त्यासोबतच आधार प्रमाणिकरणास सुरूवात करण्यात आली.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई येथे पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. जिल्ह्यातील नांदर्खे आणि खोंडमळी गावातील आपले सरकार सेवा केंद्र, विविध कार्यकारी सेवा सोसायटी शाखा, जिल्हा बँक शाखा अशा विविध ठिकाणी ही यादी प्रदर्शित करण्यात आली.यादीनुसार पात्र शेतकºयांचे आधार प्रमाणिकरण करण्यात येत असून प्रमाणिकरण प्रमाणपत्र वितरीत करण्यात येत आहे. प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या शेतकºयांना शासनातर्फे कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.प्रमाणिकरण करताना बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक आणि बोटांचे ठसे यावरून माहिती तपासण्यात येत आहे. एक ते दोन मिनिटाच्या आत ही प्रक्रीया पुर्ण होत असल्याने शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. जिल्हा उपनिबंधक अशोक चाळक आणि सहायक उपनिबंधक निरज चौधरी यांनी दोन्ही गावांना भेट देऊन प्रमाणिकरण प्रक्रीयेची माहिती घेतली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या हस्ते खोंडमाळी येथे प्रातिनिधीक स्वरुपात आधार प्रमाणिकरण प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. आधार प्रमाणिकरणात समस्या आल्यास त्या त्वरीत दूर करून इतरही गावांमध्ये ही प्रक्रीया तातडीने सुरू करण्यात येणार आहे.पात्र शेतकरी कर्जमुक्तीनंतर एप्रिलपासून पुढील हंगामासाठी कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहेत. खरीप हंगामापूर्वी कर्जमुक्तीचा लाभ मिळत असल्याने येत्या हंगामातील शेतीसाठी याचा खºया अर्थाने उपयोग होईल, अशी प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली. जाहीर झालेल्या यादीत नांदर्खेच्या २२२ आणि खोंडामळीच्या २१२ शेतकºयांचा समावेश आहे. आधार प्रमाणिकरणासाठी शेतकºयांनी सकाळपासून आपले सरकार सेवा केंद्र आणि बँक शाखेत मार्गदर्शन करण्यात येत होते. मंगळवारीदेखील ही प्रक्रीया सुरू रहाणार आहे. पात्र शेतकºयांनी आधार प्रमाणिकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.