शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात स्वच्छ सव्र्हेक्षणाच्या कार्यशाळेत वाद-विवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले. स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत पालिकेने घेतलेल्या कार्यशाळेत स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित झाल्याने काही काळ गोंधळ निर्माण झाला. दरम्यान, या उपक्रमात शहरवासीयांनी सहभागी होऊन शहर स्वच्छतेसाठी योगदान देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी केले. स्वच्छ भारत, स्वच्छ सव्र्हेक्षण अंतर्गत बुधवारी नाटय़गृहात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, स्वच्छ महाराष्ट्र अभियान कार्यशाळेचे संचालक डॉ.उदय टेकाळे, नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, मुख्याधिकारी गणेश गिरी, राहुल वाघ, डॉ.अजरून लालचंदाणी आदी उपस्थित होते. या कार्यशाळेत स्वच्छ सव्र्हेक्षण करणेकामी प्रश्नांची माहिती व नगरपरिषदेने केलेल्या कार्यवाहीबाबत नगरसेवक, सेवाभावी संस्था, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील नागरिकांना यावेळी माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेबाबत सजग असले पाहिजे. पालिकेने देखील सर्वच भागात नियमित स्वच्छता होईल यादृष्टीने लक्ष दिले पाहिजे अशा सुचना केल्या.उदय टेकाळे यांनी स्वच्छ सव्र्हेक्षणासंदर्भातील माहिती दिली. याची तपासणी करतांना स्वच्छता विभागामार्फत पुरविण्यात येणा:या सेवांची कागदोपत्री तपासणी, तसेच प्रत्यक्षात फिल्डवर जावून पहाणी, नागरिकांचा प्रतिसाद अशा तीन भागात सव्र्हेक्षण केले जाणार असल्याचे सांगितले. नगराध्यक्षा र}ा रघुवंशी यांनी शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वानी प्रय} करण्याचे आवाहन केले.दरम्यान, कार्यशाळेत स्वच्छता सव्र्हेक्षणाबाबतची प्रश्नावली आणि त्याचे उत्तर याबाबत माहिती वाचून दाखविण्यात येत होती. त्यावर भाजपचे नगरपालिकेतील प्रतोद प्रवीण चौधरी यांनी आक्षेप घेतला. त्यांनी मनोगत व्यक्त करू देण्याची मागणी केली. त्यावरून वादविवाद झाला. वाद वाढत चालल्याचे पाहून कार्यशाळा आटोपती घेण्यात आली. विरोधी पक्षाचे गटनेते चारुदत्त कळवणकर, नगरसेविका संगिता सोनवणे यांनीदेखील काही बाबींवर आक्षेप घेतला.याबाबत प्रवीण चौधरी यांनी नाराजी व्यक्त करीत सांगितले, स्वच्छ सव्र्हेक्षण करतांना वास्तव बाजू पुढे आली पाहिजे. अनेक भागात आजही अस्वच्छता आहे. अनेक ठिकाणी वेळेवर कचरा उचलला जात नाही. उघडय़ावर शौचाला जावे लागते. त्यामुळे केवळ कागदोपत्री सव्र्हेक्षण न करता वास्तवातून ते झाले पाहिजे. केवळ पुरस्कार घेण्यासाठी हे अभियान नको. स्वच्छतेसंदर्भातील काही योजनांचीही चौकशी झाली पाहिजे अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.