लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : धडगाव तालुक्यातील पिंपळ चौक येथे वीज कोसळून महिलेचा मृत्यू झाला़ रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली़ नाजाबाई नेवश्या पाडवी (32) असे मयत महिलेचे नाव असून रविवारी सायंकाळी पावसाचे वातावरण झाल्यानंतर त्या घराच्या आवारात सामानाची आवराआवर करत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली़ यात त्यांचा जागीच मृत्यू झाला़ तहसील प्रशासनाने घटनेची माहिती जिल्हास्तरावर कळवली आह़े
धडगाव तालुक्यात वीज कोसळून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 12:27 IST