नंदूरबार : पत्नीला आणण्यास गेलेल्या एका व्यक्तीला सासरच्या दोघांनी बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना मोजरापाडा, ता. धडगाव येथे बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.सुनील जोदा वळवी (२९, रा. मोजरा) असे मृताचे नाव आहे. सुनिलची पत्नी १५ दिवसांपासून माहेरी गेली होती. तिला आणण्यासाठी तो मोजरापाडा येथे गेला होता. रात्री सासरची मंडळी व सुनिल यांच्यात वाद झाला. भरत रुख्या पाडवी व बाबुलाल रुख्या पाडवी यांनी सुनीलला बेदम मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
सासरच्या लोकांच्या मारहाणीत जावयाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 03:34 IST