नंदुरबार : नवससाठी सोडलेल्या रेडय़ाने धडक दिल्याने मोहन केस:या गावीत (50, रा. वाघशेपा) यांचा मृत्यू झाल्याची घटना वाघशेपा, ता.नंदुरबार येथे घडली. या प्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.मोहन गावीत हे गुरे चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना नवसासाठी गावात सोडलेल्या रेडय़ाने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. ही घटना वेळेवर लक्षात न आल्याने तसेच उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
नवससाठी सोडलेल्या रेडय़ाच्या धडकेत इसमाचा मृत्यू
By admin | Updated: April 1, 2017 18:09 IST