शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मटनाच्या भाजीच्या वादातून झटापटीत मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सारंगखेडा : आईने मटनाची भाजी बनवली नाही याचा राग आल्याने मुलगा व वडील यांच्यात झालेल्या झटापटीत ...

लोकमत न्यूज नेटवर्कसारंगखेडा : आईने मटनाची भाजी बनवली नाही याचा राग आल्याने मुलगा व वडील यांच्यात झालेल्या झटापटीत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना वडाळी, ता.शहादा येथे 3 जून रोजी घडली होती. त्यानंतर वडिलांनी मुलाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली. याप्रकरणी सोमवारी सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन आरोपी वडीलास अटक केली आहे.याबाबत वृत्त असे की, वडाळी, ता.शहादा येथे पंकज उर्फ समाधान प्रताप धनगर (28) हा कुटुंबासह राहत होता. 3 जून रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास त्याने आपल्या आईला मटनाची भाजी बनविण्यास सांगितले. मात्र आई आजारी होती व त्यादिवशी सोमवार असल्याने आई व वडिलांनी त्याला नकार दिला. याच कारणावरुन त्याचे वडील प्रताप बुधा धनगर हे समाधानची समजूत घालत असताना त्यांच्यात झटापट झाली. त्यात समाधानच्या डोक्याला मागील बाजूस गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. समाधानचा मृत्यू झाल्याचे लक्षात आल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचे प्रेत बैलगाडीत टाकून त्यांच्या शेताजवळील नाल्यात जाळण्यात आले. या घटनेची 4 जूनपासून  वडाळी परिसरात दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा सुरू होती. त्यावरून वडाळीचे पोलीस पाटील गजेंद्रगीर गोसावी यांनी प्रताप धनगर यांना बोलवून या घटनेबाबत विश्वासात घेऊन विचारणा केली असता      प्रताप धनगर यांनी घटनेची कबुली दिली. त्यावरून पोलीस पाटील गजेंद्रगीर अजरुनगीर बावा यांनी सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून प्रताप बुधा धनगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक गणेश न्हायदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोरे व हवालदार श्रावण बिरारे हे करीत आहेत. दरम्यान, मयत समाधान धनगर हा एका पायाने अपंग होता. दिव्यांगांच्या समस्या सोडविण्यासाठी तो नेहमी प्रयत्नशील राहायचा. एका खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षक म्हणून नोकरीला होता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी, भावजयी असा परिवार आहे.