शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

रांझणीत आगीत होरपळून गाय-वासराचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:32 IST

एक लाखाचे नुकसान : मंगळवारी दुपारची घटना

रांझणी : रांझणी, ता.तळोदा येथे मंगळवारी शॉटसर्किटने गुरांच्या गोठय़ाला आग लागली. या आगीत गोठय़ात बांधलेल्या गायी-वासारांचा होरपळून जागीच मृत्यू झाला. या गोठय़ा शेजारीच बांधलेल्या गाय व वासरालाही या आगीची झळ पोहोचल्याने त्यांची ही प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर पशुवैद्यकांकडून उपचार सुरू आहेत.दरम्यान, गोठय़ात ठेवण्यात आलेली लाकडी अवजारे ही जळून खाक झाली आहेत. आग लागताच गावातील तरूणांनी सतर्कता दर्शवत अथक परिश्रमाने आग विझविण्यात यश मिळविल्याने पुढील मोठा अनर्थ टळला आहे.याबाबत असे की, 11 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तळोदा तालुक्यातील रांझणी येथील जिल्हा परिषद शाळे शेजारी असलेल्या जिजाबाई संतोष मराठे यांच्या मालकीच्या जागेवर असलेल्या गोठय़ाला शॉटसर्कीटने आग लागली. या आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केल्याने क्षणार्धात संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या वेळी गोठय़ात बांधलेली जेठय़ा हांद्या राजपूत यांची एक गाय व एक वासरू होरपळून जागीच ठार झाले. तर गोठय़ा शेजारी बांधलेल्या शिवराम चिंधू पाचोरे यांच्या एका गायीला व वासरालाही या आगीची झळ पोहोचल्याने ही दोन्ही जनावरे गंभीररित्या भाजली गेल्याने त्यांच्यावर पशुधनविकास अधिकारी डॉ.विश्वास नवले, डॉ.गोस्वामी यांच्याकडून औषधोपचार सुरू आहेत. या आगीत गोठय़ात ठेवण्यात आलेल्या लाकडी नांगर, वखर, कोळपे, जू या सारखे शेती अवजारे, चारा, ढेप तसेच तीन खाट व अंथरून-पांघरूण सारख्या संसारोपयोगी वस्तु असे अंदाजित एक लाख 22 हजार 500 रूपयांच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत. या घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण गाव घटनास्थळी गोळा झाले होते. गावातील युवकांनी सतर्कता दाखवत जीव धोक्यात घालून आग विझविण्यासाठी प्रयत्न केल्याने पुढील मोठा अनर्थ टळला असल्याचे समजते. घटनास्थळी तलाठी राहूल जाधव यांनी पाहणी करून अहवाल तहसील विभागाकडे पाठविला आहे. दरम्यान सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व पोलीस पाटील यांनी ही भेट देवून घटनेविषयी माहिती जाणून घेतली.