शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
4
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
5
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
6
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
7
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
8
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
9
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
10
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
11
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
12
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
13
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
14
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
15
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
16
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
17
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
18
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
19
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
20
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई

नंदुरबारात विविध आजारांनी दीड हजार बालकांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 12:12 IST

दोन वर्षातील स्थिती : उपचारांची सोय असूनही दुर्लक्ष

नंदुरबार : आरोग्य सुविधा आणि शासकीय योजनांचा रतीब लागणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यात विविध आजारांमुळे गेल्या दोन वर्षात शून्य ते पाच वर्ष वयाची १ हजार ७२७ बालके दगावल्याचा अहवाल आहे़ यातील निम्मी बालके ही शहरी भागात उपचार घेताना दगावल्याची माहिती असून लागण झालेले आजार हे बरे होण्यासारखेच होते, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे़१ जिल्हा, दोन उपजिल्हा आणि ११ ग्रामीण रुग्णालये, ५९ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि २९० उपकेंद्रांंसह सातपुड्यात बोटीचे दवाखाने, फिरते पथकांद्वारे आरोग्य सेवा दिली जाते़ कुपोषणामुळे संवेदनशील असल्याने जिल्ह्यात शून्य ते पाच वर्षे वयाच्या बालकांसाठी सतत मोहिमा राबवल्या जातात़ यातून कुपोषित बालकांची संख्या कमी होण्याच्या आकडेवारीतील तफावत नेहमी चर्चेचा विषय ठरत असल्याने हा मुद्दा कायम आहे़ परंतू जिल्ह्यात या व्यतिरिक्त विविध आजारांनी होणारे बालकांचे मृत्यू चिंतेचा विषय असून वेळीच उपचार न मिळणे व आजारांबाबत जनजागृतीचा अभाव यातून बालकांना प्राण गमवावे लागल्याचे २०१७-१८ व २०१८-१९ या वर्षात समोर आलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे़ २०१८-१९ या वर्षात न्यूमोनिया या आजाराने ८५, अवेळी जन्म आणि वजनात कमी यातून १४८, अतीसार आणि इतर आजारातून ६, जखमेत जंतूसंसगार्गतून ११६, श्वसनाच्या विकारातून ११६, जन्मजात विकृतीतून ३१, श्वसनाच्या त्रासातून १०१, अपघातातून जखमी झालेले १०, पाण्यात बुडाल्याने १३, विषबाधा आणि सर्पदंशाने ७, अकस्मात ५, मेंदूज्वराने ११ तर इतर अनोळखी आजारांनी २१५ अशा एकूण ८४४ बालकांचा मृत्यू झाला़ शून्य ते ५ वर्ष वयोगटातील ही बालके आहेत़ तालुकानिहाय आकडेवारीनुसार नंदुरबार ५०, नवापूर ४४, तळोदा ११, शहादा ४४, अक्कलकुवा १२६ तर धडगाव तालुक्यात सर्वाधिक १५१ बालकांचा बळी गेला आहे़ ग्रामीण भागातून शहरी भागात रुग्णालयात उपचार सुरु असताना ४१८ तर ग्रामीण भागात घरीच बळी गेलेल्या बालकांची संख्या ही ४२६ आहे़ एकाच वर्षात ८४४ बालकांचा बळी गेल्याने या आरोग्य सेवेबाबतचे गांभिर्य वाढले आहे़ २०१७-१८ या वर्षातही हीच गत असल्याचे चित्र आहे़ या वर्षात न्यूमोनिया ७०, कमी वजनामुळे १८४, अतीसार १४, जखमेतील जंतूसंसर्गामुळे १३९, श्वसन विकारामुळे १०८, विकृतीने ५०, श्वसनाच्या त्रासाने ७५, अपघातात ११, बुडून ६, सर्पदंश आणि विषबाधेने १५, मेंदूज्वराने ९, अकस्मात ८ तर इतर आजारांनी १९४ अशा अशा ८८३ बालकांचा मृत्यू झाला होता़