लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मूक बधीर दिव्यांगांच्या समस्या सोडवण्याच्या मागणीसाठी मूक व कर्ण बधिरांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिल़े जिल्हा कर्णबधिर असोसिएशनने जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांना यावेळी निवेदन दिल़े निवेदनात दिव्यांगांची जनगणना करावी, 5 टक्के अनुदान द्यावे यासह विविध मागण्या करण्यात आल्या़ नेहरु चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली़ प्रसंगी अध्यक्ष रतीकांत पाटील, वाहिद रंगरेज यांच्यासह जिल्ह्यातील कर्णबधीर उपस्थित होत़े
विविध मागण्यांसाठी कर्णबधिरांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 12:09 IST