नंदुरबार : शहरातील जुना बैलबाजार परिसरात राहणा:या युवतीवर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली़ शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत युवतीसह तिचे वडील जखमी झाले आहेत़ जुना बैल बाजार परिसरात राहणा:या युवतीने शहर पोलीस ठाण्यात राजधर गुलाब माळी (रा़ जीटीपी महाविद्यालय भिलाटी जवळ) याच्याविरोधात तक्रार अर्ज दिला होता़ या गोष्टीचा राग आल्याने तसेच तू गॅदरिंग बघण्यासाठी का, गेली या गोष्टीची विचारणा करत शुक्रवारी माळी याने 6 जानेवारी रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास युवतीच्या घरी जाऊन तिला व तिच्या वडिलांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली़ यादरम्यान त्याने कमरेत लपवलेला नारळ कापण्याच्या सु:याने युवतीच्या डाव्या बरगडीच्या खाली वार करत तिला गंभीर दुखापत केली़ यावेळी तिला सोडवण्यास गेलेल्या तिच्या आई-वडील आणि भाऊ यांना मारहाण केली़ या मारहाणीत युवतीच्या वडीलांच्या डाव्या पंजावर सुरा मारल्याने तेही जखमी झाल़े या घटनेनंतर संशयित हल्लेखोर राजधर गुलाब माळी हा घटनास्थळावरून फरार झाला़ याबाबत युवतीने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजधर माळी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े
चाकूने वार करत युवतीवर प्राणघातक हल्ला
By admin | Updated: January 8, 2017 00:14 IST