लोकमत न्यूज नेटवर्कनंदुबार : स्वप्नाळू तरुणाईच्या आवडत्या ‘व्हॅलेंटाइन विक’ला शुक्रवारी ‘रोज डे’ने सुरुवात झाली़ येत्या १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा होणार असला तरी त्याच्या आठ दिवस आधीपासून त्याची चाहूल लागण्याचा दिवस म्हणजे रोड डे होय़ शहरातील शाळा महाविद्यालय आणि हॉटेल्समध्ये साजरा झालेला रोज डे यंदा टवटवीत गुलाबांसोबत खास अशा कागदी फुलांमुळे स्पेशल ठरला आहे़सोशल मिडियामुळे अव्यक्त असलेलं प्रेम व्यक्त करणाऱ्यांची सोय झाली आहे़ परंतू यातही व्हॅलेंटाईन डे किंवा वीक साजरा करणाऱ्यांची कमी नाही़ सात फेब्रुवारी रोजी येणाºया रोझ डे वेगळेपणाने साजरा करण्यासाठी हौशी युवकांनी शहरातील दुकानांमध्ये गर्दी केली होती़ या व्यतिरिक्त फुलविक्रेत्यांनी रोझ डे च्यानिमित्ताने नाशिक, धुळे, मुंबई, गुजरात राज्य तसेच कर्नाटकातून लाल, पिवळे, पांढरे आणि गुलाबी रंगाच्या गुलाबांची आवक करुन घेतली होती़ १५ रुपयाला एक याप्रमाणे सकाळपासून गुलाबांची विक्री करण्यात आली़रोझ डे च्या निमित्त नंदुरबार शहर आणि परिसरातील हॉटेल्समध्ये सकाळी बºयापैकी गर्दी होती़ रोझ डे च्या निमित्ताने नंदुरबार तालुका व परिसरातील फुल विक्रेत्यांच्या मालाला उठाव मिळाला होता़ गुरुवारी सायंकाळी आणि सकाळी त्यांच्याकडून शहरात माल पोहोचता करण्यात आला होता़ धानोरा रोड, आष्टे परिसर येथून गुलाबाच्या फुलांची सायंकाळीही आवक करण्यात आली़लाल गुलाब प्रेम दर्शवणारा सर्वात कॉमन रंग आहे. लाल गुलाब हा रोमान्स, पॅशन आणि इंटेन्स इमोशनशी संबंधित असल्याने अनेकांनी त्याचा आजच्या दिवशी वापर केला़पिवळा गुलाब हा मैत्रीसाठी वापरला जातो. पिवळा रंग हा जोशपूर्ण, तजेलदार आणि उत्साह देणारा मानला जातो. सोबतच आनंद आणि चांगल्या आरोग्याच्या शुभेच्छा देण्याचे प्रतीक असल्याने अनेकांनी आज त्याद्वारे शुभेच्छा दिल्या़पांढरा गुलाब हा तुटलेल्या नात्याला पुन्हा जोडून दुरावा सारण्यासाठी पांढºया गुलाबाचा वापर करणे योग्य असते़ पांढरा गुलाब हा साधेपणा, विनम्रता, शांती आणि मनातील चांगल्या गोष्टीचा प्रतिक मानला जात असल्याने त्यालाही मागणी होती़पिंक गुलाब हा समोरच्या व्यक्तीप्रति कृतज्ञता आणि आभार व्यक्त करण्यासाठी वापरला जातो. व्हॅलेंटाइन डे हा केवळ जोडीदारासोबत प्रेम करण्यासाठी नाही तर आई, वडील, शिक्षक, भाऊ, बहीण, मित्र यांच्या विषयीही प्रेम व्यक्त करण्यासाठी अनेकांनी पिंक गुलाब देऊन रोझ डे साजरा केला़नैसर्गिकरित्या उगवलेल्या गुलाबाच्या फुलांना मागणी असताना बाजारात मिळणाºया कागदी आणि पक्ष्यांच्या पिसांपासून तयार केलेल्या गुलाबांनाही यंदा मागणी होती़ विशेष म्हणजे यंदा शहरात प्रथमच कागदी गुलाबांचे विविध प्रकार विक्रीस आल्याचे दिसून आले़ यात प्रामुख्याने गोल्ड आणि रेड या दोन या कागदी गुलाबांनी लक्ष वेधून घेतले़ साधारण १०० ते १५० रुपयांपर्यंत त्यांची विक्री झाली़ कायम आठवण आणि शोभेची वस्तू म्हणूून अनेकांनी त्याची खरेदी केली़ यात पक्ष्यांच्या पिसांपासूून तयार केलेल्या लाल फुलांनाही चांगली मागणी होती़ गुलाबाच्या फुलांसारख्या दिसणाºया या कागदी फुलांनिही अनेकांचा आजचा दिवस स्पेशल केल्याने चैतन्य निर्माण झाले होते़
कागदी फुलांनी बनवला यंदाचा रोझ डे ‘स्पेशल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 13:09 IST