लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : किरकोळ वादातून निर्माण झालेल्या शत्रुत्त्वातून एकास मारहाण करण्यासाठी तिघांनी लावलेल्या सापळ्यात तसाच दिसणारा दुसरा युवक अडकल्यानंतर त्यास जीवघेणी मारहाण झाल्याचा प्रकार काठी ता़ अक्कलकुवा येथे घडला़ 21 ऑक्टोबर रोजी झालेल्या घटनेत मारहाण झालेल्या पिडित युवकाचा चेहरा विद्रुप झाला आह़े काठी येथील विलास सुरुपसिंग पाडवी याचा काही दिवसांपूर्वी खुंटामोडी येथील रमेश नामक व्यक्तीसोबत वाद झाला होता़ यातून दोघांमध्ये वैर निर्माण झाले होत़े विलास याने रमेश याचा काटा काढण्याचे ठरवले होत़े दरम्यान 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी रमेश काठी येथे येणार असल्याची माहिती विलास यास मिळाली होती़ यातून त्याने गावातील आणखी दोघांसोबत सापळा रचला होता़ दरम्यान सायंकाळी साडेसात वाजता अंधार पडल्यानंतर गावातील गायत्री माता मंदिरासमोरुन जाणा:या वाहनात रमेश असल्याचा समज झाल्यानंतर वाहन अडवत चालकास मारहाण करण्यास सुरुवात केली़ यादरम्यान विलास याने ¨शंदीच्या झाडाची धारदार फांदी वाहन चालकाच्या चेह:यावर मारल्याने कानाचा भाग कापला जावून चेहरा विद्रूप झाला़ यावेळी आरडाओरड झाल्याने तिघांनी चाचपडून पाहिले असता, मार खाणारा खुंटामोडीचा रमेश नसून भगदरीचा लाकडाईपाडा येथील महेंद्र फत्तू वसावे असल्याचे समजून आल्यानंतरही तिघांनी मारहाण करणे सुरुच ठेवत जीवे ठार मारण्याची धमकी दिली़ यादरम्यान तिघांनी महेंद्र याच्या गाडीच्या मागील दरवाजाची काच फोडून नुकसान केल़े जखमी महेंद्र वसावे याला तातडीने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होत़े त्याठिकाणी उपचार पूर्ण झाल्यानंतर गुरुवारी दुपारी महेंद्र वसावे याने मोलगी पोलीस ठाणे गाठून विलास सुरुपसिंग पाडवी आणि त्याच्या दोन साथीदारांविरोधात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल केला़ तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बागुल करत आहेत़ या घटनेची परिसरात चर्चा रंगली आह़े
रात्रीच्या अंधारात खुंटामोडीच्या रमेश ऐवजी भगदरीच्या महेंद्रवर केला हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 21:12 IST