लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मोहर्रमनिमित्त इमाम बादशहा दर्गावर होणारी गर्दी लक्षात घेता दर्गावर जाणारा रस्ता पोलिसांनी बॅरीकेटींग लावून सील केला. या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांचीही नेमणूक करण्यात आली आहे.मोहर्रमनिमित्त येथील इमाम बादशहा दर्गावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यानिमित्त नवस फेडणाऱ्यांचीही मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. याच ठिकाणी दरवर्षी उरूस देखील भरविला जातो. यंदा मात्र कोरोनामुळे सर्व उपक्रम रद्द करण्यात आले. उरूस देखील रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला पंचकमेटी आणि भाविकांनीही सहकार्य केले. रविवारी मोहर्रमनिमित्त या दर्ग्यावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी शनिवारी सायंकाळपासूनच दर्ग्यावर जाणारा रस्ता बंद केला होता. रस्त्यावर बॅरीकेटींग लावण्यात येऊन पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाविकांनी जे सहकार्य केले त्याबद्दल पोलीस विभागाने आधीच सर्वांचे कौतूक केले आहे. या पुढील दिवसात देखील सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
दर्गा रस्ता पोलिसांनी केला बॅरीकेटींग लावून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 12:48 IST