शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तापी नदीवरील प्रकाशा पूल वाहतुकीसाठी धोकेदायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:10 IST

ठिकठिकाणी खड्डे व लोखंडी सळ्या वर आल्याने पुलाला तडे

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : तापी नदीवर येथे असलेल्या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक अक्षरश: हैराण झाले आहेत. काही ठिकाणी लोखंडी सळ्या वर आल्याने वाहनांचे नुकसान होत असून दुचाकी वाहनधारकांसाठी ते धोकेदायक ठरत आहे. लोखंडी सळ्या वर आल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने अवजड वाहनांमुळे पुलाला हादरा बसत असून काही ठिकाणी तडेही जात आहेत.सविस्तर वृत्त असे की, प्रकाशा गावाजवळ तापी नदीवरील पूल जिल्ह्यातील दळणवळणासाठी मुख्य मानला जातो. या पुलावरुन दिवसभर वाहनांची वर्दळ असते. मात्र पुलावरील रस्त्याच्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने           दुर्लक्ष केले आहे. या पुलावरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून जागोजागी लोखंडी सळ्या बाहेर आल्या आहेत. या सळ्यांमुळे वाहनांना हादरा बसतो व अपघातही होत आहेत. दीड वर्षापूर्वी या पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. हे काम महिनाभर सुरू होते. या कामात प्रामुख्याने पुलाच्या खाली बेअरींग टाकणे व पुलाच्या जॉईंटचे काम करण्यात आले होते. पुलावर पडलेल्या खड्डय़ांमध्ये अवजड वाहनाचे चाक पडल्यावर पुलाला हादरा बसतो व जॉईंटच्या ठिकाणी तडे पडत आहेत. दोन ते तीन ठिकाणी असे तडे गेल्याने पुलाला मोठा धोका निर्माण होत आहे. या खड्डय़ांमधून लोखंडी सळ्या बाहेर निघण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे अपघात होत आहेत.प्रकाशा येथे रविवारी विसरवाडी-खेतिया या राष्ट्रीय महामार्गाच्या दुस:या टप्प्याचे म्हणजे कोळदा ते खेतियार्पयतच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात वि.का. सोसायटीचे चेअरमन हरी पाटील यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिका:यांना पुलावरील खड्डय़ांबाबत विचारणा केली असता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका:यांनी सांगितले की, दीड वर्षापूर्वी पुलाचे काम झाल्याचे सांगितले. मात्र हे उत्तर दिशाभूल करणारे आहे. कारण दीड वर्षापूर्वी पुलाच्या दुरुस्तीचे फक्त बेअरींग टाकणे व जॉईंट दुरुस्तीचे काम झाले होते. दुरुस्तीचे पूर्ण            काम झाल्यावर डांबरीकरणाचा एक लेअर टाकणे गरजेचे होते. मात्र ज्या कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता त्यांनी हे काम केले नाही. परिणामी पुलावर खड्डे पडून तडेही जात आहेत. हा पूल ज्या विभागाच्या अखत्यारीत असेल त्या अधिका:यांनी पुलावरील रस्त्याचे नूतनीकरण करणे गरजेचे  आहे अन्यथा पुलाला हानी पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.