शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

केळीची झाडे कापून नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 12:25 IST

शेतकरी त्रस्त : जावदेतर्फे बोरद शिवारात महिनाभरात दुस:यांदा नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील जावदेतर्फे बोरद येथील  लीलाबाई यादव  चौधरी या महिला शेतक:याच्या  शेतातील केळी  पिकाचे सुमारे 60 ते 70 झाडे कापून 80 हजार रुपयांचे नुकसान केल्याची घटना घडली. यापूर्वी 17 सप्टेंबर रोजीही अनोळखी व माथेफिरू व्यक्तीकडून 40 केळीची झाडे कापून नुकसान केले होते. या घटनांमुळे शेतकरी  हवादिल झाले आहेत. याबाबत म्हसावद पोलिसात तक्रार देऊनही पोलिसांकडून आरोपीचा शोध लागत नसल्यामुळे शेतक:यांमध्ये तीव्र नाराजी पसरली  आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, प्रशांत यादव चौधरी यांच्या आई  लिलाबाई यादव चौधरी  यांचे  जावदा शिवारातील गट नं. 5/2 या क्षेत्रातील सहा एकर केळीची लागवड केली आहे. 13 ऑक्टोबर रोजी  रात्री अनोळखी व माथेफिरू लोकांनी केळीची 60 ते 70 झाडे कापून या घटनेची पुनरावृत्ती केली. मागील महिन्यात अशीच घटना घडली होती. त्यावेळी देखील केळी, पपई व कापसाच्या झाडांचे नुकसान  करण्यात आले होते. त्यामुळे शेतक:यांना मोठय़ा प्रमाणात  आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. आतादेखील संबंधित शेतक:यांचे अंदाजे 70 ते 80  हजार रुपयांचे नुकसान करण्यात आले आहे. प्रशांत चौधरी रात्री उशीरार्पयत शेतातच होते. सकाळी शेतात गेल्यानंतर हा प्रकार उघडकीस  आला. काढणीवर आलेल्या  केळीच्या झाडांचेच हे माथेफिरु नुकसान करतात. त्यामुळे परिसरातील शेतक:यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण असून माथेफिरुंचा बंदोबस्त करण्याची मागणी होत  आहे.17 सप्टेंबर रोजीही चौधरी यांच्या शेतातील केळीची झाडे कापून नुकसान केल्याने त्यांनी 18 सप्टेंबर रोजी म्हसावद पोलीस स्टेशनला लेखी तक्रारी अर्ज दिला होता. परंतु पोलीस प्रशानाने दखल घेतली नाही . वेळीच या घटनेची पोलिसांनी दखल घेतली असती तर  या घटनेची पुनरावृत्ती झालीच नसती. पिकासोबतच शेती साहित्य चोरीला जाण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुन्हा अशा घटना होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिका:यांनी लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील शेतक:यांकडून होत आहे.