तालुक्यातील कुसुमवेरी, रोषमाळ बुद्रूक, हरणखुरी, भुजगाव, जुने धडगांव, नवागाव, पालखा, वडफळ्या, उमराणी परिसरात मका ,भुईमूग, व ज्वारीच्या शेतात डुकरांचा संचार सुरु आहे. रात्रीच्यावेळी शेतात शिरुन डुकरे तोडणीस आलेल्या पिकांचे नुकसान करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
कुसुमवेरी येथील ठुमला पावरा यांच्या मका व भुईमूग तर रोषमाळ बुद्रूक येथील उदयसिग पावरा यांच्या ज्वारीच्या शेतात डुकरांनी नुकसान केल्याची माहिती आहे. हरणखुरी,भुजगाव, जुने धडगांव, नवागाव, पालखा,वडफळ्या,उमराणी या गावांमध्येही शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. अचानक वाढीस लागलेल्या डुकरांचा वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी आहे. डुकरांना पळवण्यासाठी शेतकरी फटाके फोडण्यासह इतर उपक्रम करूनही डुकरांचा संचार सुरूच असल्याची माहिती देण्यात आली आहे.