शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस दलाकडून सायबर जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर सेफ वूमन हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यांतर्गत विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा पोलीस दलातर्फे सायबर सेफ वूमन हा उपक्रम हाती घेण्यात आला असून यांतर्गत विविध पोलीस ठाणे हद्दीत जनजागृती करण्यात येत आहे़ यांतर्गत शनिवारी डी़आऱहायस्कूलचे शिक्षक-शिक्षिका आणि विद्यार्थिनींसोबत पोलीस अधिकाऱ्यांनी संवाद साधला़यावेळी सायबर सेलचे पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे, शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक सुनिल नंदवाळकर, उपप्राचार्य एस.व्ही. चौधरी, प्रा. एम.एल. अहिरराव, निशिकांत शिंपी, उमेश शिंदे, दामिनी पथक प्रमुख रोहिणी धनगर, मीना पवार आदी उपस्थित होते.कार्यक्रमात बोलताना संदीप रणदिवे यांनी सांगितले की, महिलांनी स्वत:च्या सुरक्षितेसाठी सोशल मिडीयाचा वापर काळजीपूर्वक करावा, महिलांची सुरक्षा हा विषय अत्यंत संवेदनशील बनला असून त्याबाबत विविध माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे. महिलांनी दैनंदिन जीवनात इंटरनेटशी संबंधीत सर्व अ‍ॅप्स वापरतांना दक्षता घ्यावी, वैयक्तिक माहिती सोशल मिडियावरल अनोळखी व्यक्तीला पाठवू नये, इंटरनेटवरील फसव्या संदेशापासून सावध रहावे, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पोलीसांची मदत घ्यावी़पोलीस निरीक्षक नंदवाळकर यांनी यांनी मोबाईलमधील विविध अ‍ॅपच्या वापरामुळे मुलींची व महिलांची होणारी फसवणूक याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.पोलीस निरीक्षक रणदिवे यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे माहिती देत सायबर गुन्हेगारांची कार्यपद्धती समजावून दिली़ शिक्षिका व विद्यार्थिनींच्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून देण्यात आली़ दामिनी पथकाच्या महिला कर्मचाऱ्यांनीही विद्यार्थिंनीसोबत संवाद साधत चर्चा केली़ येत्या काळात जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे़सायबर सेलआनलाईन संवाद, सोशल इंजिनियरिंग, फिशिंग, नोकरीचे लाभ दाखवून होणारी फसवणूक, लग्नाचे आमिष दाखवून होणारी फसवणूक, बँकिंग विषयक फसवणूक, व्हॉटसअ‍ॅप, फेसबुक प्रोफाईल फोटोंचा गैरवापर, चाईल्ड पोर्नोग्राफी, सायबर ग्रुमिंग, सायबर बुलींग, मार्फिंग, सायबर बदनामी, आॅनलाईन हालचालींचा पाठलाग, आॅनलाईन गेमिंगमुळे महिलांची सुरक्षा या विषयावर सायबर सेलकडून जनजागृती होत आहे़